Government Employee News : जर तुम्ही सरकारी सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या परिवारातून अथवा तुमच्या फ्रेंड सर्कलमधून, मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.
खरेतर, शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी नोकरदार मंडळींना शासनाच्या माध्यमातून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात. सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेतनासोबतच महागाई भत्ता दिला जात असतो.
याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्ट्यांव्यतिरिक्त इतर अन्य कामांसाठी रजा देखील दिल्या जात असतात. पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भात आणि त्यांच्या रजेसंदर्भात विशेष नियम तयार केलेले असतात.
यामध्ये केंद्रीय नागरी सेवा नियम 1972 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली आहे.
केंद्रीय नागरी सेवा नियम 1972 च्या कलम 12 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सलग किती दिवसांची सुट्टी घेतली तर त्यांची सेवा समाप्ती होऊ शकते यासंदर्भात स्पष्टपणे तरतूद करून देण्यात आली आहे.
वास्तविक, अनेक शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या लोकांच्या माध्यमातून सेवा समाप्ती बाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. सलग किती दिवसांची रजा घेतली तर सेवा समाप्ती होऊ शकते असा प्रश्न संबंधितांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
दरम्यान आता आपण 1972 च्या केंद्रीय नागरी सेवा याच्या कलम 12 मध्ये करण्यात आलेली याबाबतची तरतूद जाणून घेणार आहोत.
सदर तरतुदीनुसार जो कोणी सरकारी कर्मचारी सलग पाच वर्ष सुट्टीवर राहिलं त्या कर्मचाऱ्याला सक्तीची सेवा समाप्ती दिली जाईल.
म्हणजे सलग पाच वर्षे सुट्टीवर राहिल्यास तर कार्यक्र कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त होऊ शकते. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षांची रजा मंजूर होऊ शकत नाही. मात्र यामध्ये परदेश सेवा अपवाद आहे.
मात्र इतर कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षाची कोणत्याही प्रकारची रजा मिळू शकत नाही. जो कोणी कर्मचारी सलग पाच वर्ष आपल्या कर्तव्यावर अनुपस्थित राहिला तर त्याला सेवेतून कार्यमुक्त केले जाते.