Government Employee News : जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढणार आहे.
खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जाते. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जात असतो.
दरम्यान गेल्या वर्षी अर्थातच जुलै 2023 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 एवढा करण्यात आला आहे. आता यामध्ये जानेवारी 2024 पासून वाढ होणे अपेक्षित आहे.
किती वाढणार महागाई भत्ता
महागाई भत्ता हा एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असतो. दरम्यान, एआयसीपीआयच्या डिसेंबर 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता हा आणखी चार टक्क्यांनी वाढणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
अर्थातच सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये आता आणखी चार टक्क्यांची वाढ होण्या अपेक्षित आहे. म्हणजेच महागाई भत्ता हा 50 टक्क्यांवर जाणार आहे.
केव्हा होणार निर्णय ?
दरवर्षी मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीचा निर्णय होत असतो. यावर्षी देखील मार्च महिन्यातच याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी 24 मार्च 2023 ला जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता वाढवण्यात आला होता.
यंदा देखील मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र महागाई भत्ता वाढ ही जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. अर्थातच 50 टक्के महागाई भत्ता हा जानेवारी 2024 पासून लागू होईल.
याचा रोखीने लाभ मात्र मार्च महिन्याच्या वेतनासोबत दिला जाईल. अर्थातच जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
किती वाढणार पगार ?
जर एखाद्या कर्मचाऱ्याला दरमहा 53,500 रुपये मूळ वेतन मिळत असेल तर त्याला 46% प्रमाणे सध्या 24,610 रुपये एवढा महागाई भत्ता मिळत आहे.
आता, जर डीए 50% पर्यंत वाढला तर त्यांचा डीए 26,750 रुपये होईल. म्हणजे, त्यांचा मासिक पगार 26750 – 24610 = 2140 ने वाढणार आहे.