Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लोकसभेच्या निवडणुकांआधीच एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे. खरे तर, सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो.
जानेवारीपासून ते जूनपर्यंतच्या पहिल्या सहामाहीत आणि जुलैपासून ते डिसेंबर पर्यंतच्या दुसऱ्या सहामाहीत महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. सध्या स्थितीला सरकारी कर्मचाऱ्यांना 46% एवढा महागाई भत्ता दिला जात आहे.
विशेष बाब अशी की, जानेवारी 2024 पासून हा महागाई भत्ता पाच टक्क्यांनी वाढणार असा दावा केला जात आहे. म्हणजेच महागाई भत्ता 51 टक्क्यांवर जाणार आहे. याचा निर्णय मात्र मार्च 2024 मध्ये होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.
तत्पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या काही महिन्यांची मागणी पूर्ण होणार असे संकेत मिळू लागले आहेत. खरे तर येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
याचाच एक भाग म्हणून कोरोना काळात रखडलेली महागाई भत्ता थकबाकी देखील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार अशी माहिती समोर येत आहे. जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही.
यामुळे ही थकबाकीची रक्कम तात्काळ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून केली जात आहे. त्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
याच पाठपुराव्याचा भाग म्हणून भारतीय इम्युनिटी मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी या 18 महिन्यांच्या थकबाकीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक पत्र लिहिले आहे.
यामध्ये मुकेश सिंग यांनी 18 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना देण्याची मोठी मागणी केली आहे.
तसेच याबाबतचा निर्णय उद्या जाहीर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घ्या असे म्हटले आहे. यामुळे आता मुकेश सिंग यांच्या या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.