Government Employee News : देशभरातील लाखों सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. पगारवाढीबाबत केंद्र शासन लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे.
या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या या निर्णयानंतर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना देखील लाभ होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाच्या माध्यमातून लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केली जाणार आहे.
या फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार मोठा वाढणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण केंद्र शासन या फॅक्टर मध्ये किती वाढ करणार आणि यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात किती वाढ होणार याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
फिटमेंट फॅक्टर किती वाढणार?
हाती आलेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाकडून एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र शासन केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये आता वाढ करणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे. या सध्याच्या फिटमेंट फॅक्टर नुसार कर्मचाऱ्यांना किमान अठरा हजार रुपये मूळ वेतन मिळत आहे.
मात्र आता फिटमेंट फॅक्टर 3.68 पट होणार आहे. जर एवढा फिटमेंट फॅक्टर वाढला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 वरून 26,000 होणार आहे. याचाच अर्थ कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात आठ हजार रुपयाची वाढ होणार आहे. निश्चितच हा निर्णय केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचा राहणार आहे.
महागाई भत्ता देखील वाढणार !
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील तीन टक्के वाढणाआहे. जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा तीन टक्के डीए वाढणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% डीए मिळत आहे यामध्ये तीन टक्के वाढ झाली तर 45 टक्के एवढा डीए कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे डीए वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे.