Government Employee News : 2024 हे नवीन वर्ष सुरू होऊन आता अकरा दिवसांचा काळ उलटला आहे. दरम्यान या नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून मोठी भेट मिळणार अशी आशा आहे. खरे तर हे नवीन वर्ष निवडणूकांचे राहणार आहे. पाच वर्षानंतर अर्थातच 2019 नंतर यंदा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या की लगेचच काही महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहे. म्हणजे हे संपूर्ण वर्ष निवडणुकांमध्येचं जाणार आहे. त्यामुळे या नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असा दावा केला जात आहे.
विशेष बाब म्हणजे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होण्यापूर्वीच मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम बजेट सादर करणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा होतील अशी आशा आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अंतरिम बजेटमध्ये कोणत्याच मोठ्या घोषणा होणार नाहीत हे आधीच स्पष्ट केले आहे. मात्र असे असले तरीही आगामी निवडणूका पाहता केंद्रातील मोदी सरकार सर्वचं घटकांना साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करणार आहे.
त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग स्थापित करण्याची मोठी घोषणा होईल असा दावा केला जात आहे. खरे तर 1947 मध्ये पहिला वेतन आयोग स्थापित झाला होता. यानंतर दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापित झाला.
सातव्या वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला होता. मात्र या वेतन आयोगासाठी च्या समितीची स्थापना 2014 मध्ये झाली होती.
दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोगाची स्थापना होत असल्याने आता 2026 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होईल अशी आशा आहे. त्यासाठीच्या समितीची स्थापना मात्र 2024 मध्येच करावी लागणार आहे.
दरम्यान केंद्रातील मोदी सरकारला याबाबतचा प्रश्न विचारला असता मोदी सरकारने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. सरकारने सध्या स्थितीला आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणताच विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी विचाराधीन नसल्याचे सरकारने सांगितले आहे. वित्त विभागाचे सचिव टीव्ही सोमनाथन यांनी देखील याबाबतचा प्रस्ताव सध्या तरी शासन दरबारी विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे.
पण आगामी लोकसभेची निवडणूक पाहता केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये याबाबतची घोषणा होऊ शकते असा दावा केला जात आहे. यामुळे येत्या बजेटमध्ये आठवा वेतन आयोगाबाबतची घोषणा होते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.