Government Employee News : जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी कर्मचारी म्हणून सेवा बजावत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे.
लवकरच देशभरातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना म्हणजेच निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना केंद्रातील मोदी सरकार एक मोठी भेट देणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
सदर वृत्तानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार लवकरच वाढणार आहे. कारण की, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत पीटीआय या एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार, सरकार महागाई भत्त्यात जुलै महिन्यापासून तीन टक्के वाढ करणार आहे.
ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे. यानुसार जुलै महिन्यापासून संबंधितांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 45 टक्के एवढा होणार आहे. यामुळे पगारात मोठी वाढ होणार असा दावा केला जात आहे.
याबाबत मात्र केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणतीच अधिकारीक माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट मध्ये जुलै महिन्यापासून देशभरातील एक कोटी शासकीय कामगारांना तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष बाब म्हणजे हा लाभ पुढल्या महिन्यापासून अर्थातच सप्टेंबर महिन्यापासून रोखीने संबंधित कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. याचाच अर्थ संबंधितांना जुलै महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंतची महागाई भत्ता थकबाकी म्हणजे डीए एरियर देखील मिळणार आहे.
किती रुपयाने वाढणार पगार ?
ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18 हजार रुपये आहे अशा कर्मचाऱ्यास सध्याच्या DA दरानुसार म्हणजे 42% प्रमाणे 7560 रुपये दर महिना महागाई भत्ता मिळतोय. पण ज्यावेळी हा DA 45% होईलं तेव्हा अठरा हजार किमान पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना आठ हजार शंभर रुपये दरमहिना महागाई भत्ता मिळणार आहे. अर्थातच सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनात महिन्याला 540 रुपयाची वाढ होणार आहे आणि वार्षिक आधारावर 6480 रुपयाची वाढ होणार आहे.