Government Employee News : येत्या 15-16 दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर या चालू वर्षात या सरकारी नोकरदार मंडळीला अनेक लाभ मिळाले आहेत.
या मंडळीसाठी 2023 हे वर्ष विशेष खास ठरले आहे. या चालू वर्षात महागाई भत्त्यात तब्बल आठ टक्के वाढ झाली आहे. मात्र आता येणारे नवीन वर्ष या चालू वर्षापेक्षा अधिक खास राहणार असा दावा केला जात आहे.
कारण की येत्या नवीन वर्षात या नोकरदार वर्गाला तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत. त्यांना महागाई भत्ता वाढीचा तर लाभ मिळणारच आहे शिवाय त्यांच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये सुद्धा वाढ होणार आहे.
एवढेच नाही तर नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता देखील वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल असा दावा केला जात आहे.
किती वाढणार महागाई भत्ता ?
नवीन वर्षात जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता पाच टक्क्यांनी वाढेल असा दावा केला जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% एवढा आहे.
यामध्ये पाच टक्के वाढ झाली तर हा भत्ता 51 टक्क्यांपर्यंत जाणार आहे. शिवाय जुलै 2024 पासून यामध्ये आणखी वाढ होईल. यामुळे निश्चितच या सरकारी नोकरदार मंडळीच्या वेतनात मोठे वाढ सुनिश्चित होणार आहे.
घर भाडे किती भत्ता वाढणार
मिळालेल्या माहितीनुसार नवीन वर्षात घर भाडे भत्ता वाढीचा देखील लाभ मिळणार आहे. सध्या एक्स श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 27% वाय श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 18 टक्के आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 9 टक्के HRA मिळत आहे. आता मात्र यामध्ये तीन टक्क्यांपर्यंतची वाढ होणार आहे.
यानुसार एक्स श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा एच आर ए 30%, वाय श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा 20 टक्के आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा दहा टक्के एवढा होणार आहे. ज्यावेळी महागाई भत्ता 50% क्रॉस करेल त्यावेळी ही वाढ लागू होणार आहे.
फिटमेंट फॅक्टर वाढणार
सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 पट एवढा आहे. पण लवकरच हा फॅक्टर 3.68 पट एवढा होईल असा अंदाज आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ सुनिश्चित होणार आहे. सध्या या लोकांचे मूळ वेतन 18000 एवढे आहे. पण फिटमेंट फॅक्टर वाढल्यास हे किमान मूळ वेतन 21 हजारावर जाणार आहे.