Government Employee News : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघा दहा ते बारा दिवसांचा काळ बाकी आहे. नववर्षापूर्वी ख्रिसमस अर्थातच नाताळ देखील सेलिब्रेट होणार आहे. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह संपूर्ण देशात मोठे उत्साहाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. मेघालय राज्य सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांना लवकर पगार देण्याचे जाहीर केले आहे.
ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर मेघालय सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा डीए अर्थातच महागाई भत्ता 3% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार हा लवकरच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्याचा पगार नाताळ सणाच्या पूर्वीच राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री कोणराड के संगमा यांनी याविषयी माहिती दिली आहे. मेघालय सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा तेथील जवळपास 55 हजार राज्य कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
यामुळे संबंधित राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तेथील राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. याशिवाय पंजाब राज्य शासनाने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे.
पंजाब सरकारने घेतलेला हा निर्णय डिसेंबर महिन्याच्या वेतन सोबत लागू होणार आहे. म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबत संबंधित कर्मचाऱ्यांना रोखीने लाभ मिळणार आहे.
खरे तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच पंजाब आणि मेघालय राज्याने घेतलेले हे निर्णय तेथील राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठे दिलासादायी ठरणार आहेत. विशेष म्हणजे नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा मोठा लाभ दिला जाणार आहे.
नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तब्बल पाच टक्क्यांनी वाढणार असा दावा केला जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के एवढा. यामध्ये पाच टक्के वाढ झाली तर हा महागाई भत्ता 51 टक्क्यांवर जाणार आहे.
असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वृद्धी होणार आहे. विशेष म्हणजे महागाई भत्ता 50 टक्क्यांवर गेल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता देखील वाढवला जाणार आहे. त्यामुळे येणारे नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे.