Government Employee News : काल राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काल राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. काल शिंदे-फडणवीस-पवार सरकारची राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे.
या बैठकीत सर्वसामान्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे.
राज्य शासनाने राज्यातील काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय कालच्या महत्त्वाच्या बैठकीत घेतला आहे.
यामुळे सदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे. खरे तर जुनी पेन्शन योजनेवरून राज्यात सध्या मोठे वादंग उठले आहे.
जुनी योजना लागू करावी अशी सरकारी कर्मचाऱ्यांचे मागणी आहे. 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरसकट ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे तुम्ही पेन्शन योजना लागू करा असे सरकारी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र अजूनही याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु काही निवडक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे.
काल अर्थातच 10 जानेवारी 2024 ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरार येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील काही निवडक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार सदर प्राधिकरणामध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वी कार्यरत असलेल्या आणि १२ जुलै २००७ च्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने ताब्यात घेतलेल्या पुनर्वसन केंद्रातील काही निवडक कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.
यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार या सदर प्राधिकरणातील २३ कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे संबंधितांच्या माध्यमातून यावेळी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.