Government Employee News : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी सेवेत कार्यरत असेल तर आजची ही बातमी अशा सर्व व्यक्तींसाठी विशेष खास राहणार आहे. खरंतर आगामी वर्षात देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका सुरू होणार आहेत.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांसाठी मंथन सुरू केले आहे. 2024 मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका देखील राहणार आहेत आणि लोकसभा निवडणुका देखील राहतील. अशा परिस्थितीत या निवडणुकीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी सरकारसाठी घातक ठरू शकते.
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील 18 महिन्यांची महागाई भाता थकबाकीची रक्कम लवकरच दिली जाणार आहे.यासाठी केंद्रीय स्तरावर कामगार युनियन आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये चर्चेचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
कामगार युनियनने सरकारी कर्मचाऱ्यांची कोरोना काळातील 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी द्यावी किंवा याचे वन टाइम सेटलमेंट करावे अशी मागणी केली आहे. वन टाइम सेटलमेंट म्हणजेच मागील महागाई भत्ता थकबाकी कर्मचाऱ्यांना न देता एकाच वेळी DA मध्ये मोठी वाढ करणे होय.
जर केंद्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी देण्याचा निर्णय घेतला तर प्रथम श्रेणी मधील सरकारी अधिकाऱ्यांना तब्बल दोन लाख 18 हजारापर्यंतची महागाई भत्ता थकबाकी मिळणार आहे. यामुळे आता या 18 महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीबाबत केंद्र शासनाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
या मागणीवरही होणार सकारात्मक निर्णय
याव्यतिरिक्त, केंद्रशासन नवीन पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेसारखे लाभ देखील देऊ शकते असा देखील दावा काही मेडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर नवीन पेन्शन योजनेत बदल केला जाऊ शकतो आणि सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या रकमेच्या 40 ते 45 टक्के एवढी रक्कम पेन्शन स्वरूपात नवीन पेन्शन योजनेतून दिले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.
यासोबतच जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी चार टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये आणखी 4% वाढ होणार म्हणजेच महागाई भत्ता ४६ टक्के एवढा होणार आहे.