Government Pension Scheme : आपल्यापैकी अनेकजण उतारवयात पैशांची तंगी सहन करावी लागू नये यासाठी गुंतवणूक सुरू करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्हीही उतारवयात आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे.
खरेतर अलीकडे गुंतवणुकीसाठी विविध ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. मात्र असे असले तरी आजही आपल्या देशात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवले जात आहे.
दरम्यान जर तुम्हीही उतारवयात पैसे हवे म्हणून कुठे गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी अटल पेन्शन योजना एक फायदेशीर पर्याय ठरणार आहे. अटल पेन्शन योजना ही एक सरकारी पेन्शन स्कीम आहे. या योजनेत दिवसाला सात रुपये सेव करून तुम्ही वार्षिक 60 हजार रुपयांची पेन्शन प्राप्त करू शकता.
ही पेन्शन योजना प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी, शेतकरी, शेतमजूर व इतर क्षेत्रातील सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान, आता आपण या योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महिन्याला 5 हजाराची पेन्शन मिळणार
अटल पेन्शन स्कीम ही एक अशी पेन्शन योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दरमहा फक्त 210 रुपये म्हणजेच दिवसाला फक्त 7 रुपये जमा करून, 60 वर्षांनंतर दरमहा 5,000 रुपये कमाल पेन्शन मिळवू शकता.
म्हणजेच तुम्हाला या योजनेतून वार्षिक 60 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही एक सरकारी स्कीम आहे. या योजनेची सुरुवात मोदी सरकारने केलेली आहे. सरकारी स्कीम असल्याने येथील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे.
अटल पेन्शन योजनेच्या सध्याच्या नियमांनुसार, जर तुम्हाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मासिक 5000 रुपये पेन्शन हवे असेल आणि तुम्ही या योजनेत 18 व्या वर्षी सहभाग घेतला तर तुम्हाला महिन्याला 210 रुपये गुंतवावे लागणार आहेत.
तुम्ही या योजनेत मासिक, त्री मासिक आणि सहामाही गुंतवणूक करू शकणार आहात. तुम्ही दर तीन महिन्यांनी रक्कम भरल्यास तुम्हाला 626 रुपये द्यावे लागतील आणि दर सहा महिन्यांनी भरल्यास तुम्हाला 1,239 रुपये द्यावे लागतील.
1 हजार रुपये पेन्शन साठी 42 रुपये भरावे लागतील
जर तुम्हाला 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मासिक 1000 रुपये पेन्शन हवी असेल आणि तुम्ही या योजनेत 18 व्या वर्षी नाव नोंदले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 42 रुपये गुंतवावे लागणार आहेत.
योजनेतून तुम्हाला एक हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतची मासिक पेन्शन मिळू शकते. म्हणजे तुम्हाला जेवढी पेन्शन हवी असेल त्यानुसार तुमची गुंतवणुकीची अमाऊंट ठरणार आहे.