Gratuity Rules : जर तुम्हीही एखाद्या कंपनीत कामाला असाल ? तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. खरे तर, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील काही आर्थिक लाभ दिले जातात. खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा देखील लाभ मिळत असतो.
मात्र हा लाभ सर्वच कर्मचाऱ्यांना मिळत नाही. एका ठराविक कालावधीसाठी एकाच कंपनीत काम करणाऱ्यां कर्मचाऱ्याला कंपनीच्या माध्यमातून ग्रॅच्युइटी दिली जाते. मात्र या ग्रॅच्युइटी बाबत कर्मचाऱ्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था पाहायला मिळते.
किती वर्षे काम केल्यानंतर ग्रॅच्युइटी मिळते ? ग्रॅच्युइटीची रक्कम कशी मोजली जाते? असे वेगवेगळे प्रश्न नोकरदारांच्या माध्यमातून उपस्थित केले जातात. दरम्यान आज आपण याच प्रश्नांचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती वर्षे काम केल्यानंतर मिळते ग्रॅच्युइटी
ग्रॅच्युइटी किंवा सेवा उपदानाची रक्कम फक्त रिटायरमेंट घेतलेल्या कर्मचाऱ्यालाच मिळते असे नाही तर किमान पाच वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी मिळू शकते.
मात्र ज्या कंपनीत दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कामाला आहेत त्याच कंपनीमधील कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळत असते. सलग पाच वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ मिळतो.
रिटायरमेंट नंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांना ही रक्कम दिली जात असते. आता आपण ग्रॅच्युइटीची रक्कम मोजण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
ग्रॅच्युइटीची रक्कम कशी मोजली जाते?
(शेवटचा पगार) x (कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या) x (१५/२६) हा फॉर्मुला वापरून ग्रॅच्युइटीची रक्कम काढली जात असते.
या फॉर्मुलानुसार जर समजा एखाद्या नोकरदार व्यक्तीचा शेवटचा पगार हा चाळीस हजार रुपये असेल आणि त्याने एखाद्या कंपनीत पाच वर्षे काम केले असेल तर त्याला किती ग्रॅच्युइटी मिळणार हे आता आपण पाहणार आहोत.
(40000)×(5)×(15/26)= एक लाख 15 हजार 384 रुपये. म्हणजे सदर व्यक्तीला एक लाख 15 हजार 384 ग्रॅच्युइटी म्हणून दिले जाणार आहेत.