Havaman Andaj January 2024 : गेल्या वर्षाची एंडिंग ही अवकाळी पावसाने झाली. गेल्या वर्षातील नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात अवकाळी पावसाने त्राहीमाम माजवला होता.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतला आहे. रब्बी हंगामातील ऐन वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
दरम्यान नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसातून आता कुठे पिके थोडीफार सावरली होती. अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे.
आगामी काही तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे राहणार असून राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात वीकेंडला अर्थात शनिवारी आणि रविवारी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पुढील 48 तासात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
काय म्हणतय भारतीय हवामान विभाग
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार झाले आहे.
त्यामुळे सध्या राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान तयार झाले असून पावसाची शक्यता आहे. आगामी 48 तासात राज्यातील काही भागात पावसाची हजेरी लागणार आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्या कोकणातील दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात या कालावधीमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार येथेही आज आणि उद्या अवकाळी पाऊस होणार आहे. पुणे, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर आणि नासिक येथेही अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील या संबंधित भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची आणि चाऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.