Havaman Andaj Maharashtra : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान आणि रात्रीचे किमान तापमान वाढले आहे. कमाल तापमानाने 42 अंश सेल्सिअस पर्यंतचा टप्पा गाठला आहे. अकोला, बुलढाणा, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, मालेगाव यांसारख्या ठिकाणी कमाल तापमान हे 40°c पेक्षा अधिक नमूद केले जात आहे.
विशेष म्हणजे राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस देखील सुरू आहे. पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे. मात्र असे असले तरी अनेक भागांमध्ये तापदायक उन्हाळा अनुभवायला मिळत आहे.
दरम्यान, अशा या तापदायक उन्हाळ्याच्या सुरुवातीला राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे.
सध्या उन्हामुळे नागरिक परेशान आहेत. परिणामी या अवकाळी पावसामुळे का होईना त्यांना दिलासा मिळणार आहे. पण, या अवकाळी पावसाचा शेती पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे पश्चिम बंगालमधील काही भागात चक्रीवादळाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमध्ये चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले असून आसाम मध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस बरसणार
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अहमदनगर, बीड, छ. संभाजीनगर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या सदर 17 जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान खात्याने येल्लो अलर्ट दिलेला आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे या सदर भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकीकडे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तर दुसरीकडे राज्यात उष्णतेची लाट देखील येणार असाही अंदाज हाती आला आहे.
राज्यातील सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ या भागात आगामी तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असा अंदाज यावेळी भारतीय हवामान खात्याने सार्वजनिक केला आहे.
या पार्श्वभूमीवर या सदर जिल्ह्यातील नागरिकांसाठी उष्णतेचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष सावध राहण्याची गरज आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात अवकाळी पाऊस बरसणार असल्याने राज्यात समिश्र वातावरणाची अनुभूती होणार आहे.