Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस सुरू आहे. ढगाळ हवामानामुळे आणि मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील राज्यांना मोठा फटका बसत आहे. महाराष्ट्राला देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून शेती पिक यामुळे वाया जाणार अशी भीती व्यक्त होत आहे.
नवीन वर्षाची सुरुवातच अवकाळी पावसाने झाली असल्याने हे नवीन वर्ष राज्यातील शेतकऱ्यांना मोठे त्रासदायक ठरू शकते असे बोलले जात आहे. आधीच खरीप हंगामातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळालेले नाही.
यामुळे शेतकऱ्यांचा सर्व मदार रब्बी हंगामावर आहे. रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा होती. आता मात्र रब्बी हंगामावर अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळत असल्याने रब्बीच्या उत्पादनात देखील मोठी भीती येईल अशी भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, रब्बी हंगामातील पिके अवकाळी पावसामुळे खराब होत असल्याने आता अवकाळी पाऊस केव्हा विश्रांती घेणार हाच मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. राज्यातील थंडीबाबत आणि अवकाळी पावसाबाबत हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी लांबला आहे. आता अवकाळी पाऊस उद्यापर्यंत अर्थातच अकरा जानेवारीपर्यंत कायम राहणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
एवढेचं नाहीतर तापमानात देखील मोठा बदल पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे गेल्या 24 तासात देशातील अनेक भागांमध्ये पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे उद्यापर्यंत हीच परिस्थिती कायम राहणार असून देशातील अनेक भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढणार आहे तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाचे तांडव सुरू राहणार आहे. यामुळे देशात विरोधाभासी वातावरण पाहायला मिळत आहे. या मिश्रित वातावरणामुळे मात्र काही ठिकाणी असलेल्या शेती पिकांना फायदा मिळत आहे तर काही ठिकाणी असलेल्या शेती पिकांचे नुकसान होत आहे.
काल कोकण, नासिक, जळगाव, पुणे, सातारा या भागात अवकाळी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आगामी काही राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरूच राहणार असा अंदाज आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवारी राज्याच्या उपराजधानीत म्हणजेच नागपूर मध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण कायम आहे.
तसेच पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत ढगाळी वातावरण तर काही जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज आयएमडीने यावेळी दिला आहे.