Havaman Andaj : राज्यासह देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. महाराष्ट्रात तर काही भागात गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली.
गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्रात गारपीट झाल्याने तेथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच झाली होती. राज्यात डिसेंबरमध्ये मात्र पावसाचा जोर खूपच कमी होता.
आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे आहे. काही भागात ढगाळ हवामान पाहायला मिळाले आहे. मात्र अवकाळी पावसाची नोंद कुठेच झालेली नाही. डिसेंबरच्या सुरुवातीला मिचॉंग चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस झाला.
पण आता चक्रीवादळ पूर्णपणे निवळले असल्याने अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. शिवाय महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे.प्रामुख्याने उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला आहे.
खरे तर दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासूनच थंडीचा जोर वाढतो. यंदा मात्र डिसेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला असतानाही कडाक्याची थंडी पडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आता जरूर थंडीला सुरुवात झाली आहे मात्र अजूनही देशात सर्व दूर थंडी पडत नाहीये.
शिवाय आता भारतीय हवामान विभागाने आगामी 48 तास देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेष बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्रातही पुढील काही तास अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एवढेच नाही तर देशातील काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे निश्चितच ऐन हिवाळ्यात बरसणार हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या शेती पिकांसाठी घातक ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
कुठे बरसणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यात तामिळनाडूमध्ये १५ ते १७ डिसेंबर, केरळ आणि माहेमध्ये १६ ते १८ डिसेंबर, तर लक्षद्वीपमध्ये १७ आणि १८ डिसेंबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
या संबंधित राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असे देखील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तसेच जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस होईल आणि काही भागात हिमवर्षाव होईल असे IMD ने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे.
यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांना विशेष सावध राहण्याची गरज आहे. केरळमध्ये मुसळधार पावसाची आणि गारपीटीची शक्यता असल्याने याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस होईल असे सांगितले जात आहे. यामुळे आता हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.