HDFC Bank FD News : भारतात फार पूर्वीपासून एफडी मध्ये गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. अलीकडे तर महिला देखील मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करत आहेत. याचे कारण म्हणजे मुदत ठेव योजनेतून आता गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे.
आधी फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केल्यास फारसा फायदा मिळत नव्हता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बँकांच्या माध्यमातून चांगले व्याज दिले जात आहे.
दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी एचडीएफसी बँकेची विशेष योजना फायदेशीर ठरणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारतातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणून ख्यातनाम असलेल्या एचडीएफसीने आपल्या ग्राहकांसाठी सीनियर सिटीजन केअर एफडी सुरू केली आहे.
ही योजना सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत आता जवळ येऊ लागली आहे. या योजनेत 10 मे 2024 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.
यामुळे ज्या ग्राहकांना या योजनेत गुंतवणूक करायची असेल त्यांनी ताबडतोब गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. दरम्यान आता आपण या एफडी योजनेचे स्वरूप थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे सीनियर सिटीजन केअर एफडी स्कीम
खरे तर एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून सीनियर सिटीजन ग्राहकांना एफडीवर 0.50 टक्के अधिकचे व्याज दिले जात आहे.
मात्र बँकेने सुरू केलेल्या सीनियर सिटीजन केअर एफडी स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यास सीनियर सिटीजन ग्राहकांना 0.75 टक्के अधिकचे व्याज मिळणार आहे.
या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.75 टक्के रेटने व्याज मिळणार आहे. या योजनेचा कालावधी पाच वर्ष एक दिवस ते दहा वर्ष एवढा आहे.