HDFC Bank News : HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेषता ज्यांना नजीकच्या भविष्यात एचडीएफसी बँकेत एफडी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. बँकेने मुदत ठेवींवरील (FD) व्याजदर वाढवले आहे. खरंतर एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे.
एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याप्रमाणे देशातील सर्वात मोठी सहकारी बँक आहे तशीच एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. HDFC बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन, पर्सनल लोन, एज्युकेशन लोन असे विविध कर्ज उपलब्ध करून देत आहे.
याशिवाय बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर देखील चांगले व्याज दिले जात आहे. आता या बँकेत एफडी करणाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. कारण की, HDFC बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर मुदत ठेवींच्या व्याजदरात 25 बेस पॉइंट्स (bps) पर्यंत वाढ केली आहे.
या बड्या प्रायव्हेट बँकेने नुकताच हा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, 9 फेब्रुवारी 2024 पासून बँकेने एफडीच्या व्याजदरात सुधारणा केली आहे.
नवीन सुधारित व्याजदरानुसार आता ग्राहकांना एफ डी वर चांगला परतावा मिळू शकणार आहे. दरम्यान आता आपण एचडीएफसी बँकेचे नवीन सुधारित FD चे व्याजदर कसे आहेत ? याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या कालावधीच्या एफडी व्याजदरात सुधारणा केली
एचडीएफसी बँकेने 9 फेब्रुवारी 2024 पासून 18 महिन्यांपासून ते 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. या कालावधीच्या एफडी व्याजदरात बँकेने 0.25 टक्के एवढी वाढ केलेली आहे.
आधी या कालावधीच्या एफडीवर सात टक्के एवढे व्याज दिले जात असे. आता मात्र या कालावधीच्या एफडीवर 7.25 टक्के एवढे व्याज मिळत आहे. पण हे व्याजदर दोन कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी लागू राहणार आहे. यापेक्षा जास्तीची गुंतवणूक करायची ठरल्यास या व्याजदराचा लाभ मिळणार नाही.
बँकेचे FD चे सुधारित व्याजदर
मिळालेल्या माहितीनुसार ही बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.5% ते 7.75% दरम्यान व्याज ऑफर करत आहे. बँकेने 18 महिन्यांपासून ते 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठीचा व्याजदर हा 7% वरून 7.25% पर्यंत वाढवला आहे.
एचडीएफसी बँक सध्या सामान्य नागरिकांसाठी 7 ते 29 दिवसांच्या कालावधीत मुदत ठेवींवर 3 टक्के व्याज दर देत आहे. 30 ते 45 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 3.50% व्याज मिळेल, तर 46 दिवस ते 6 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 4.50% व्याज मिळणार आहे.
बँक सहा महिने ते एक दिवस ते नऊ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदतीसह ठेवींवर 5.75% व्याजदर देत आहे. त्याच वेळी, बँका 9 महिने ते एक दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 6 टक्के व्याज ऑफर करत आहे.