HDFC Bank Personal Loan : एचडीएफसी ही प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. बँक आपल्या करोडो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी परवडणाऱ्या व्याजदरात विविध कर्ज उपलब्ध करून देते.
बँकेकडून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात पर्सनल लोन उपलब्ध करून दिले जात आहे. तथापि, जाणकार लोकांनी जेव्हा कुठूनच पैशांची ऍडजेस्टमेंट होत नसेल तेव्हाच पर्सनल लोन घेण्याचा सल्ला दिला आहे.
कारण की, वैयक्तिक कर्ज हे खूपच महाग असते. वैयक्तिक कर्जासाठी इतर कर्जाच्या तुलनेत अधिक व्याजदर द्यावे लागते.
यामुळे पर्सनल लोन घेण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. दरम्यान आता आपण एचडीएफसी बँकेच्या पर्सनल लोन बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
एचडीएफसी बँकेचे पर्सनल लोन साठीचे व्याजदर
एचडीएफसी बँकेकडून सध्या 10.75 टक्क्यांपासून ते 24 टक्के व्याजदरात पर्सनल लोन दिले जात आहे. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक आहे अशा ग्राहकांना किमान 10.75 टक्के व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध होऊ शकते.
मात्र ज्यांचा सिबिल स्कोर यापेक्षा कमी आहे त्यांना वैयक्तिक कर्जासाठी अधिक व्याजदर द्यावे लागणार आहे.
एकंदरीत सिबिल स्कोर च्या आधारावर वैयक्तिक कर्जाचा व्याजदर ठरवला जात असतो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जात असतो.
5 वर्षांसाठी 15 लाखाचे पर्सनल लोन घेतले तर किती व्याज भरावे लागणार
एचडीएफसी बँकेकडून जर 10.75 टक्के व्याजदरात पाच वर्षांच्या कालावधीसाठी 15 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर अशा व्यक्तीला 32,427 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच चार लाख 45 हजार 416 रुपये एवढे व्याज सदर व्यक्तीला भरावे लागणार आहे. म्हणजेच व्याजासहित 19 लाख 45 हजार 416 रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत.