HDFC Bank Personal Loan : तुम्हीही एचडीएफसी बँकेचे ग्राहक आहात का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. आज आपण एचडीएफसी बँकेकडून दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाबाबत माहिती पाहणार आहोत. एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. आरबीआयने नुकत्याच काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या आपल्या सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत या बँकेला देखील स्थान मिळाले आहे.
अर्थातच या बँकेतील ग्राहकांचा पैसा हा पूर्णपणे सुरक्षित आहे. प्रायव्हेट सेक्टरमधील ही बँक पूर्णपणे सुरक्षित तर आहेच शिवाय आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकेकडून स्वस्त व्याज दरात विविध कर्ज देखील उपलब्ध करून दिले जात आहे.
ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात वैयक्तिक कर्ज सुद्धा उपलब्ध करून देते. यामुळे जर तुम्ही ही एचडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
खरंतर, वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे अधिक असतात. इतर कर्जाशी तुलना केली असता वैयक्तिक कर्जाचे व्याजदर काहीसे अधिक भासतात. अशा परिस्थितीत, जेव्हा पैशांची खूपच अधिक निकड असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घेणे परवडते.
तथापि, जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा तयारीत असाल तर नेहमी अशा बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेतले पाहिजे जी बँक स्वस्त व्याजदरात कर्ज देते. एचडीएफसी ही देखील अशीच एक बँक आहे जी आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वैयक्तिक कर्ज देत आहे.
एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर !
मिळालेल्या माहितीनुसार, प्रायव्हेट सेक्टर मधील एचडीएफसी बँकेकडून आपल्या ग्राहकांना 10.75% ते 24 टक्के वार्षिक व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांना किमान 10.75 टक्के व्याजदरात एचडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. ज्यांचा स्कोर हा 750 पेक्षा अधिक असतो त्यांचा सिबिल चांगला असल्याचे मानले जाते. म्हणजेच ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असेल अशा व्यक्तींना एचडीएफसी बँकेकडून 10.75 टक्के व्याजदरात वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
एचडीएफसी बँकेकडून 12 लाखाचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागेल
जर एचडीएफसी बँकेकडून एखाद्या ग्राहकाने 12 लाख रुपयांचे कर्ज पाच वर्षांच्या कालावधीसाठी घेतले तर त्याला कितीचा हप्ता भरावा लागू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांच्या कालावधीसाठी एचडीएफसी कडून बारा लाख रुपयांचे कर्ज घेतले तर अशा ग्राहकाला 10.75 टक्के व्याज दराने मासिक 25 हजार 942 रुपयांचा हप्ता भरावा लागू शकतो.
म्हणजेच सदर व्यक्तीला पाच वर्षांच्या कालावधीत पंधरा लाख 56 हजार 492 रुपये मूळ रक्कम आणि व्याजासहित बँकेला परत करावे लागणार आहेत. अर्थातच तीन लाख 56 हजार 493 रुपये एवढी रक्कम सदर व्यक्तीला व्याजाच्या स्वरूपात भरावे लागणार आहेत.