HDFC Credit Card : अलीकडे बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आता प्रत्येक भारतीयांचे बँकेत खाते आहे. रोकड व्यवहारात गेल्या काही वर्षांपासून कपात झाली आहे. आता ऑनलाइन पेमेंट वाढले आहेत. डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित असल्याने आता डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणात केले जाऊ लागले आहे. डिजिटल पेमेंट साठी कार्डचा वापर सर्वाधिक केला जातो.
लोक आता एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करतात. दुकानांमध्ये आता यूपीआय, फोन पे, गुगल पे यासोबतच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. डेबिट कार्ड मात्र बँकेत पैसे असले तेव्हाच पेमेंट करण्यासाठी वापरले जाते किंवा एटीएम मधून पैसे काढण्यासाठी वापरले जाते.
डेबिट कार्ड हे बँकेच्या माध्यमातून प्रत्येक खाते धारकाला उपलब्ध करून दिले जाते. तथापि यासाठी देखील अर्ज सादर करावा लागतो. जर आपण क्रेडिट कार्डचा विचार केला तर क्रेडिट कार्ड सर्वच व्यक्तींना बँकेकडून ऑफर केलं जात नाही. क्रेडिट कार्ड काढण्यासाठी खातेधारकाला बँकेत अर्ज सादर करावा लागतो आणि क्रेडिट कार्डसाठी आवश्यक असलेल्या पात्रता देखील देखील सदर खातेदारकडे असाव्या लागतात.
क्रेडिट कार्ड हे खूपच उपयोगाचे ठरते. जर क्रेडिट कार्डचा योग्य पद्धतीने वापर केला, क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळोवेळी केले तर क्रेडिट कार्डमुळे दैनंदिन आयुष्यातली पैशांची चणचण बऱ्यापैकी कमी होते. दरम्यान जर आपणासही क्रेडिट कार्ड काढायचे असेल तर आपण एचडीएफसीचे क्रेडिट कार्ड सहजतेने घरबसल्या काढू शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
मात्र क्रेडिट कार्ड काढण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की क्रेडिट कार्ड साठी देण्यात आलेल्या लिमिट पैकी फक्त आणि फक्त 25% रक्कम वापरली पाहिजे. यापेक्षा जास्त रक्कम तुम्ही वापरत असाल तर क्रेडिट कार्ड काढणे तुमच्यासाठी तोट्याचे ठरू शकते.
यामुळे क्रेडिट कार्डची जेवढी लिमिट असेल त्यापेक्षा फक्त 25 टक्के रक्कम तुम्ही महिन्याकाठी वापरा आणि उर्वरित रक्कम तशीच राहू द्या. तसेच क्रेडिट कार्डचे पेमेंट योग्य वेळी करा अन्यथा तुमचा सिबिल डाउन होऊ शकतो. शिवाय क्रेडिट कार्डची भरावयाची रक्कम जर थकली तर तुम्हाला थकबाकी देताना अधिकचे व्याज देखील भरावे लागते. यामुळे या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.
एचडीएफसीच ऑनलाईन क्रेडिट कार्ड कसे काढणारविविध बँका क्रेडिट कार्ड वापर करतात. स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा, इत्यादी बँका क्रेडिट कार्ड ऑफर करतात. आपण कोणत्याही बँकेच क्रेडिट कार्ड घेऊ शकता.
पण आज आपण एचडीएफसी बँकेच क्रेडिट कार्ड कसे काढायचे हे जाणून घेणार आहोत. एचडीएफसीचे क्रेडिट कार्ड काढल्यास तुम्हाला पंधराशे रुपयांचे वाउचर देखील फ्री मिळते. हे क्रेडिट कार्ड तुम्ही ऑफलाइन काढू शकता. यासाठी तुम्ही बँकेत जाऊन क्रेडिट कार्ड काढण्याच्या प्रोसेस बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.
किंवा मग तुम्ही ऑनलाईन यासाठी अर्ज सादर करू शकता. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला एचडीएफसी च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला जे क्रेडिट कार्ड हवे आहे त्या क्रेडिट कार्ड साठी अर्ज करावा लागणार आहे. किंवा मग आपण https://www.hdfcbank.com/personal/pay/cards/credit-cards या लिंक वर जाऊन क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकता.