HDFC RD Scheme : एचडीएफसी ही प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे.
त्याचप्रमाणे एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील मोठी बँक आहे. या बँकेचे लाखो खातेधारक आहेत. या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.
बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्त घ्यायचा तर आता गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
याशिवाय बँक मुदत ठेव करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगले व्याजदर देखील देत आहे. याव्यतिरिक्त एचडीएफसी बँकेत आरडी करणाऱ्यांना देखील चांगला परतावा मिळू लागला आहे. त्यामुळे एचडीएफसी बँकेत आरडी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेत 120 दिवसांच्या आरडी स्कीम मध्ये प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला किती रिटर्न मिळू शकतात याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती व्याजदर देते ?
आरडी योजनेमध्ये दर महिना एक ठराविक रक्कम गुंतवता येते. या योजनेमध्ये गुंतवणूकीवर बँकेच्या माध्यमातून एक निश्चित व्याज ऑफर केल जात.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने एचडीएफसी बँकेच्या 120 दिवसाच्या कालावधीच्या आरडी स्कीम मध्ये 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक केली तर सदर गुंतवणूकदाराला सात टक्के व्याज मिळते. मात्र जेष्ठ गुंतवणूकदारांना या कालावधीच्या आरडी योजनेसाठी 7.75 टक्के एवढे व्याज दिले जाते.
यानुसार जर सर्वसामान्य ग्राहक या आरडी योजनेत प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये गुंतवत असतील तर अशा गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवर 8 लाख 68 हजार 652 रुपये मिळणार आहेत.
मात्र ज्येष्ठ नागरिकांनी जर या 120 दिवसांच्या आरडी मध्ये प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयाची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी वर 9 लाख 5 हजार 529 रुपये मिळणार आहेत.