High Court On tn Tenants and Landlords : देशात अनेक लोक भाड्याच्या घरात राहतात. तर काही लोक व्यवसायासाठी रेंटवर गाळे, दुकान घेतात आणि आपला व्यवसाय चालवतात. मात्र अनेकदा घर मालक आणि भाडेकरू यांच्यात वादविवाद होत असतात.
हे वाद विवाद अनेक प्रसंगी भांडणाचे रूप धारण करतात. यामुळे काही प्रकरणे न्यायालयात देखील पोहोचतात. खरे तर, न्यायालयाने देशातील भाडेकरू आणि घर मालकांसाठी यापूर्वीचं अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मात्र या मार्गदर्शक सूचनांचे घरमालक आणि भाडेकरू पालन करत नाहीत आणि त्यांच्यात वाद वाद होतात. मग हे वादविवाद न्यायालयात पोहोचतात. दरम्यान, असेच एक प्रकरण समोर आले आहे ते दिल्लीतून.
दिल्लीत एका भाड्याच्या जागेवर दुकान चालवणाऱ्या दुकानदाराने त्याच्या दुकानाच्या जागेच्या मालकाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. दुकान रिकामे करणे बाबत मालकाने भाडेकरूला सांगितले होते.
पण भाडेकरू याला नकार देत होता. तसेच भाडेकरूने या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात कोणताही भाडे करू आपल्या मालमत्तेचा वापर कसा करायचा याबाबत घरमालकाला आदेशित करू शकत नाही असे म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी घेतली आणि जमीनदारांना त्यांच्या जमिनीच्या हक्कापासून कोणत्याही परिस्थितीत वंचित ठेवता येणार नाही असे सांगितले.
भाडेकरू दुकानदाराने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने दुकानाच्या जागा मालकाला त्याची जागा पूर्णपणे रिकामी करून घेण्याचा अधिकार असल्याचे महत्त्वाची टिप्पणी केली आहे.
खरेतर भाडेकरू दुकानदाराने या आधी कनिष्ठ न्यायालयात देखील धाव घेतली होती. पण कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणावर भाडेकरू दुकानदाराला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे मग हे प्रकरण उच्च न्यायालयात आले. भाडेकरू दुकानदाराने दुकान जागेच्या मालकाविरोधात याचिका टाकली होती.
दरम्यान उच्च न्यायालयाने देखील ही याचिका फेटाळली आहे. उच्च न्यायालयाने, दुकानाच्या जागेचा मालक आणि त्याचा मुलगा या मालमत्तेच्या संयुक्त मालक आहेत. आता त्याच्या मुलाला त्याच ठिकाणी व्यवसाय करायचा आहे.
यामुळे त्यांनी भाडेकरूला दुकान रिकामी करण्यास सांगितले आहे. आता मालकाला त्याची जागा पूर्णपणे रिकामी करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. असं म्हणत न्यायालयाने भाडेकरूने दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.