Highest Building In India : देशात लाखो गगनचुंबी इमारती आहेत. मात्र, आज आपण देशातील सर्वात उंच दहा इमारतींची माहिती जाणून घेणार आहोत. विशेष बाब अशी की, भारतातील सर्वात उंच दहा इमारतींपैकी नऊ इमारती आपल्या महाराष्ट्रातील आहेत. विशेष बाब म्हणजे या नऊच्या 9 इमारती आपल्या राजधानीत आहेत.
देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमध्ये भारतातील सर्वात उंच दहा इमारतींपैकी 9 इमारती आहेत. देशातील सर्वाधिक उंचीची इमारत देखील मुंबईमध्येच आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया देशातील सर्वात उंच दहा इमारतींची माहिती अगदी थोडक्यात.
भारतातील सर्वात उंच इमारतींची यादी
वर्ल्ड वन : ही गगनचुंबी इमारत ९१९ फूट उंच आहे. ही इमारत भारतातील सर्वात उंच इमारत आहे. या इमारतीला वर्ल्ड टॉवर असेही म्हणतात. 17.5 एकरात पसरलेली ही इमारत दिसायला खूपच सुंदर आहे.
World View : देशातील सर्वात उंच इमारतीच्या यादीत या इमारतीचा दुसरा क्रमांक लागतो. ही देखील बिल्डिंग राजधानी मुंबईतच आहे. या बिल्डिंगची उंची 911 फूट एवढी असून यामध्ये 73 फ्लोर आहेत.
The Park : ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. मुंबईच्या वरळी भागात वसलेली ही इमारत 879 फूट उंचीची आहे.
ओंमकार टॉवर वरळी : 876 ft उंचीची ही देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत असून मुंबईमधील वरळी या भागात वसलेली आहे. या इमारतीत 73 फ्लोर आहेत.
Nathani Heights : नथानी हाइट्स ही मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात जवळ असणारी देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. या बिल्डिंगची उंची 860 फूट एवढी आहे.
The 42 : ही देशातील सहाव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत असून पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथे ही बिल्डिंग उभी आहे. पश्चिम बंगालमधील ही सर्वाधिक उंचीची इमारत आहे. या इमारतीची उंची 249 मीटर एवढी आहे.
अहुजा टॉवर : मुंबईच्या सेंटरमध्ये ही इमारत तयार झाली आहे. देशातील सर्वाधिक उंचीच्या इमारतीच्या यादीत या बिल्डिंगचा सातवा क्रमांक लागतो. बिल्डिंगची उंची 250 मीटर एवढी आहे. ही 55 मजली बिल्डिंग आहे.
One Avighna Park : मुंबईच्या परळ या भागात बिल्डिंग तयार करण्यात आली आहे. 64 फ्लोरची ही बिल्डिंग 853 फूट उंचीची आहे. ही देशातील आठव्या क्रमांकाची सर्वात उंच बिल्डिंग आहे.
Imperial Tower : मुंबईमधील सर्वाधिक उंचीच्या बिल्डिंगमध्ये या इमारतीचा देखील समावेश होतो. या बिल्डिंग मध्ये 60 मजले आहेत.
360 वेस्ट टॉवर बी : मुंबईच्या ॲनीबेसेंट रोडवर ही बिल्डिंग स्थित आहे. या बिल्डिंगची उंची 255 मीटर एवढी आहे. देशातील सर्वाधिक उंचीच्या इमारतींच्या यादीत या बिल्डिंगचा दहावा क्रमांक लागतो.