Home Loan Bank List : तुम्हालाही 2024 मध्ये स्वतःचा आशियाना बनवायचा आहे, तुम्हालाही या नवीन वर्षात स्वतःचे घर बनवायचे आहे का? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
घरांच्या किमती वेगवेगळ्या कारणांमुळे वाढल्या आहेत. परिणामी आता सर्वसामान्यांना घर घेणे अवघड होत आहे. यामुळे अनेकजण होम लोन घेऊन घराची निर्मिती करत आहेत.
विशेष म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक देखील आता होम लोन घेऊन गृहनिर्मितीचे आपले स्वप्न पूर्ण करण्याचा सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे अलीकडे देशातील अनेक बँकांच्या माध्यमातून स्वस्तात गृह कर्ज दिले जात आहे.
काही बँका महिलांना स्वस्तात गृह कर्ज देत आहेत. दरम्यान आज आपण देशातील स्वस्तात होम लोन देणाऱ्या बँकांची यादी पाहणार आहोत.
एसबीआय : SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्तात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
ही बँक ग्राहकांना तीस लाखांपासून ते 75 लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देते. या बँकेकडून 8.40% ते 10.05% या व्याजदरात ग्राहकांना गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
बँक ऑफ बडोदा : ही देखील देशातील पब्लिक सेक्टरमधील एक मोठी बँक आहे. देशात एकूण 12 पब्लिक सेक्टर बँक म्हणजेच पीएसबी आहेत. यामध्ये बँक ऑफ बडोदाचा देखील समावेश होतो. बँक ऑफ बडोदा मध्ये देना बँकेचे मर्जर झाल्यानंतर या बँकेच्या ग्राहक संख्येत वाढ झाली आहे.
ही बँक आपल्या ग्राहकांना तीस लाखांपासून ते 75 लाखांपर्यंतचे गृह कर्ज देत आहे. या बँकेकडून आपण 8.40% ते 10.65% या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र : ही महाराष्ट्रातील पब्लिक सेक्टर मधील एक प्रमुख बँक आहे. ही बँक ग्राहकांना तीस लाखांपासून ते 75 लाखांपर्यंतचे गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. या बँकेकडून 8.35 टक्क्यांपासून ते 11.15% पर्यंतच्या व्याजदरात गृह कर्ज दिले जात आहे.
बँक ऑफ इंडिया : ही बँक 8.30 टक्क्यांपासून ते 10.75 टक्क्यांपर्यंतच्या व्याजदरात गृह कर्ज देत आहे. बँकेकडून तीस लाखांपासून ते 75 लाखांपर्यंतचे गृह कर्ज दिले जात आहे. ही देखील देशातील एक प्रमुख पीएसबी आहे.