Home Loan India : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात महागाईचा आलेख खूपच वाढला आहे. वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जर घराचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर गृह कर्ज घेणे भाग पडते. अनेकांनी गृह कर्ज घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे.
तर काही लोक गृह कर्ज घेण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्हीही होम लोन घेऊन तुमच्या हक्काच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. खरंतर प्रत्येकाचे आपले स्वतःचे हक्काचे एक घर असावे ज्यात आपले संपूर्ण आयुष्य मनमुरादपणे जगता यावे असे स्वप्न असते.
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण होम लोन घेतो. दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाने होम लोन घेणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना होम लोनवरील व्याजदरात मोठी सूट देत आहे. मात्र, एसबीआयकडून दिली जाणारी ही सूट मर्यादित कालावधीसाठी दिली जाणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बँकेकडून आपल्या ग्राहकांना 65 बेस पॉइंट्स म्हणजे 0.65 टक्के पर्यंत सूट दिली जात आहे. पण SBI च्या या सवलतीचा फायदा मर्यादित कालावधीसाठी राहणार आहे. बँकेकडून याचा लाभ 31 डिसेंबर 2023 पर्यंतच दिला जाणार आहे.
त्यामुळे जर तुम्हालाही या सवलतीचा फायदा घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तुम्हाला लोनसाठी फाईल पाठवावी लागणार आहे. या होम लोनवरील व्याजदरात दिल्या जाणाऱ्या सवलतीची एक विशेषता अशी की ही सवलत सिबिल स्कोरच्या आधारावर दिली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 750-800 आणि त्याहून अधिक सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांना एसबीआय कडून 0.55 टक्के सूट दिली जाणार आहे. या सवलती नंतर या ग्राहकांना 8.60% टक्के एवढा व्याजदर लागणार आहे. तसेच ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 700 ते 749 असेल त्यांना होम लोन घेताना व्याज दरावर 0.65 टक्के सूट दिली जाणार आहे. या ऑफरनुसार संबंधित ग्राहकांना 8.7% एवढा व्याजदर लागणार आहे.
तसेच ज्यांचा CIBIL स्कोअर 151-200 दरम्यान आहे त्यांना होम लोनवर 0.65 टक्के सूट दिली जाईल आणि यानंतर त्यांना 8.7 टक्के व्याजदर लागणार आहे. एकंदरीत ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांना स्वस्त दरात एसबीआय कडून होम लोन पुरवले जाणार आहे. पण ज्या लोकांचा सिबिल स्कोर कमी आहे त्यांना होम लोनसाठी थोडेसे अधिक व्याज द्यावे लागणार आहे.
यानिमित्ताने पुन्हा एकदा सिबिल स्कोरची उपयुक्तता समोर आली आहे. दरम्यान, एसबीआयने दिलेल्या या सवलतीमुळे अनेकांना आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न स्वस्तात पूर्ण करता येणार आहे. मात्र ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी राहणार आहे. या वर्षअखेरपर्यंत ऑफर अंतर्गत ही सवलत लागू राहणार आहे.