Home Loan Interest Rate : घर खरेदी करणे ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठी अचिव्हमेंट असते. मात्र ही अचिव्हमेंट खूपच खर्चीक असते. संपूर्ण आयुष्यभर बहुकष्टाने कमावलेला पैसा घर खरेदी करण्यात निघून जातो. अलीकडे तर घरांच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की सर्वसामान्यांना घर घेण्यासाठी गृहकर्जाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.
मात्र, अलीकडे देशातील अनेक बँका कमी व्याजदरात गृह कर्ज ऑफर करत आहेत. यामुळे गृह खरेदीचे स्वप्न या महागाईच्या काळातही पूर्ण होत आहे.
जर तुम्हीही आपल्या स्वप्नातील घर खरेदीचा प्लॅन बनवलेला असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष कामाची राहणार आहे.
जर तुम्ही गृह खरेदीसाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारणार असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी देशातील अशा प्रमुख बँकांची माहिती घेऊन हजर झालो आहोत ज्या की, कमी व्याजदरात सर्वसामान्य ग्राहकांना गृह कर्ज ऑफर करत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया कमी व्याजदरात गृह कर्ज देणाऱ्या बँकांची यादी.
Bank Of India : भारतात एकूण 12 पीएसबी अर्थातच पब्लिक सेक्टर बँक आहेत आणि यामध्ये बँक ऑफ इंडिया चा देखील समावेश होतो. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त व्याजदरात गृह कर्ज ऑफर करत आहे.
बँकेच्या माध्यमातून मालमत्तेच्या किमतीच्या 90% एवढे गृह कर्ज दिले जाते. ही बँक ८.३० टक्के या सुरुवातीच्या दरात गृह कर्ज पुरवत आहे. या बँकेकडून दिल्या जाणाऱ्या गृहकर्जाच्या परतफेडीसाठी ग्राहकांना कमाल 30 वर्षांचा रिपेमेंट पिरियड मिळतो.
पंजाब नॅशनल बँक : ही देखील देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना तीस लाखांपासून ते 75 लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज ऑफर केले जात आहे. 8.45% ते 10.5% या व्याजदरात बँकेकडून सर्वसामान्यांना गृह कर्ज मिळत आहे.
बँक ऑफ बडोदा : ही देखील देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. या बँकेकडून 8.40 ते 10.60% व्याजदरात ग्राहकांना गृह कर्ज दिले जात आहे. मात्र बँकेकडून आकारले जाणारे हे व्याजदर सिबिल स्कोर वर आधारित राहणार आहेत. ज्यांचा सिबिल चांगला असेल त्यांना कमी दरात कर्ज मिळेल.
स्टेट बँक ऑफ इंडिया : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून किमान 8.40% व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. याचा रिपेमेंट कालावधी तीस वर्षांचा असतो. ही बँक महिलांना व्याजजदरात 0.05% अतिरिक्त सूट देते.
HDFC Bank : ग्राहकांना या बँकेकडून 30 ते 75 लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. बँक गृह कर्जासाठी 8.35% एवढा किमान व्याजदर आकारते. पण, ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच या किमान व्याज दरात कर्ज मिळते.