Home Loan Interest Rate : तुम्हीही गृह खरेदीच्या तयारीत आहात का ? हो मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची राहणार आहे. प्रामुख्याने ज्यांना होम लोन घेऊन गृह खरेदीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहील. खरेतर गृह कर्ज हे दीर्घ मुदतीचे कर्ज आहे. यामुळे हे कर्ज घेताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
वास्तविक, आधी भारतीय संस्कृतीत कर्ज घेणे हे चुकीचे मानले जात असे. मात्र प्रत्येक संस्कृतीत काळानुरूप बदल झाला आहे. आपल्या संस्कृतीत देखील काळानुरूप बदल घडला आहे. आता भारतीय संस्कृतीत कर्ज घेणे चुकीचे मानले जात नाही.
किंबहुना रियल इस्टेट मधील जाणकार लोक आम्ही काळात देखील घरांच्या किमती वाढतच राहणार असल्याने होम लोन घेऊन का होईना पण घराचे स्वप्न सर्वसामान्यांनी पूर्ण करून घेतले पाहिजे असा सल्ला देत आहेत. पण, जाणकार लोकांमध्ये देखील दोन मतप्रवाह आहेत. काही लोक होम लोन घेऊन घर खरेदीचा सल्ला देतात तर काही लोक होम लोन घेऊन घर खरेदी करण्याऐवजी थोडे थांबून घर खरेदीचा सल्ला देतात.
तथापि जर तुम्ही गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण देशातील अशा पाच बँकांची माहिती जाणून घेणार आहोत जे की कमी इंटरेस्ट रेटवर होम लोन पुरवत आहेत. गृहकर्ज हे साधारणपणे 15 ते 20 वर्षे कालावधीसाठी घेतले जाते.
काही लोक तर तीस वर्षांसाठी हे कर्ज घेतात. त्यामुळे हे कर्ज घेतले तर व्याज म्हणून मोठी रक्कम मोजावी लागते. पण जर व्याजदर कमी राहिला तर दीर्घकाळात यावर मोठी बचत होते. यामुळे जी बॅंक कमी इंटरेस्ट रेटवर होम लोन देते त्या बँकेकडूनच होम लोन घेण्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे.
कमी इंटरेस्ट रेटवर होम लोन देणाऱ्या बँका
Bank Of Baroda : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना कमी इंटरेस्ट रेट वर होम लोन देत आहे. ही बँक तीस वर्ष कालावधीच्या गृह कर्जासाठी 8.40% ते 10.90% एवढे व्याज आकारत आहे.
पंजाब नॅशनल बँक : भारतात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत. यात पंजाब नॅशनल बँकेचा देखील समावेश होतो. या बँकेचे गृहकर्जाचे व्याजदर 8.4% प्रतिवर्षापासून सुरू होतात आणि 30 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी (फ्लोटिंग आधारावर) 10.25% पर्यंत जाऊ शकतात.
एसबीआय होम लोन : SBI अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक 30 वर्ष कार्यकाळासाठी वार्षिक 8.50% ते 9.85% व्याजदरावर Home Loan ऑफर करत आहे.
एचडीएफसी बँक : एचडीएफसी बँक ही प्रायव्हेट सेक्टर मधील देशातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक 30 वर्ष कालावधीच्या Home Loan साठी किमान 8.7% एवढे व्याज आकारते. पण बँकेचे हे सुरुवातीचे व्याजदर आहेत. याचा लाभ हा ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच मिळणार आहे. ही बँक मालमत्ता किमतीच्या 90% पर्यंत कर्ज देऊ शकते.
आयसीआयसीआय बँक : ICICI बँक देखील देशातील खाजगी क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. ही बँक सध्या 30 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी वार्षिक 8.75% व्याजदराने गृहकर्ज ऑफर करत आहे. यासाठी बँक 0.5% प्रक्रिया शुल्क सुद्धा आकारते.