Home Loan News : केंद्र आणि राज्य शासन आपापल्या स्तरावर देशभरातील सर्वसामान्य लोकांसाठी विविध योजना सुरू करतात. समाजातील सर्वच शोषित आणि वंचित तसेच आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना चालवल्या जात आहेत.
दरम्यान आता केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील मध्यमवर्गीयांसाठी एक अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील होम लोन घेणाऱ्या नागरिकांना दिलासा दिला जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आता केंद्रशासन मध्यमवर्गीयांना होम लोन वरील व्याजात सवलत देणार आहे.
त्यानुसार आता होम लोन वरील व्याज शासन भरणार असल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडे शहरांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता सर्वसामान्यांना घर घेणे अशक्य बनत आहे. यामुळे सर्वसामान्य घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेतात.
होम लोन घेऊन मध्यमवर्गीय आपल्या घराचे स्वप्न साकार करतात. पण होम लोन वरील व्याजदरामुळे अनेकांना होम लोन भरणे अवघड बनते. मात्र आता होम लोन घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शहरात घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र शासन एक महत्त्वाची योजना सुरू करणार आहे.
या योजनेअंतर्गत शहरात घर बनवण्यासाठी होम लोन घेणाऱ्या नागरिकांना व्याजात सवलत दिली जाणार आहे. विशेष बाब अशी की ही योजना या चालू महिन्यात अर्थातच सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकते असा दावा केला जात आहे. पुरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, या योजनेचे स्वरूप अद्याप तयार झालेले नाही.
सध्या या योजनेचे स्वरूप तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र या योजनेचा फायदा असा होईल की सर्वसामान्यांना होम लोनच्या व्याजात सवलत दिली जाणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लाल किल्ल्यावरून माहिती दिली होती.
लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात मोदी म्हणाले होते की, मध्यमवर्गीय कुटुंबे शहरांमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहतात. यासाठी आम्ही लवकरच एक योजना आणणार आहोत, ज्याचा फायदा शहरात राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना होईल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला होता.
मोदींनी भाड्याची घरे, अनधिकृत वसाहती आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना स्वत:चे घर बांधण्यासाठी बँकेच्या कर्जावरील व्याजात सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे त्यावेळी सांगितले होते. यानुसार आता या योजनेचे स्वरूप आणि आराखडा तयार करण्याचे काम केले जात आहे. यामुळे आता लवकरच ही योजना मध्यमवर्गीयांसाठी सुरू होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.