Home Loan Offer : महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खर तर गेल्या काही वर्षांमध्ये महागाईचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. अलीकडे घरांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
त्यामुळे अनेक जण गृह कर्जाचा पर्याय स्वीकारतात. परंतु गृह कर्ज देखील महाग झाले आहे. महागड्या गृह कर्जामुळे जीवाचा आटापिटा करूनही अनेकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही.
अशातच मात्र महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांसाठी बँक ऑफ इंडियाने एक मोठी ऑफर आणली आहे. बँक ऑफ इंडियाने नव्याने गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना कमी व्याजदरात गृह कर्ज देण्याची मोठी घोषणा केली आहे.
सदर बँकेने होम लोन साठी असलेल्या व्याजदरमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ इंडियाने नव्याने गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना व्याजाचे दर 8.45 टक्क्यांवरून 8.3 टक्क्यांवर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क म्हणजेच प्रोसेसिंग फी देखील माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु बँकेकडून सुरू झालेली ही ऑफर काही मर्यादित कालावधीसाठीच सुरू राहणार असे बँकेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
19 मार्च 2024 पासून बँक ऑफ इंडियाची ही खास ऑफर सुरू झाली असून 31 मार्च 2024 पर्यंत ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
विशेष म्हणजे बँकेने गृह कर्जासाठी आकारला जाणारा हा सर्वात कमी दर असल्याचा दावा या ठिकाणी केला आहे. यामुळे आपल्या स्वप्नातील घरासाठी झगडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
1 लाखाच्या गृह कर्जासाठी 755 रुपयांचा हप्ता
बँकेने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार आता नव्याने गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना ८.३ टक्के दराने गृह कर्ज मिळणार आहे.
जर समजा एखाद्या ग्राहकाला या व्याजदरात ३० वर्षांच्या मुदतीसाठी Home Loan मंजूर झाले तर त्या कर्जदाराला दरमहा प्रति 1 लाखासाठी 755 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे यावर प्रक्रिया शुल्क म्हणजेच प्रोसेसिंग फी देखील लागणार नाही.
हेच कारण आहे की इतर बँकांच्या तुलनेत या बँकेकडून आता सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात गृह कर्ज उपलब्ध होईल. तथापि या ऑफरचा लाभ घेण्यासाठी 31 मार्चपर्यंतच मुदत राहणार आहे.