Home Loan : अलीकडे घराचे स्वप्न महागले आहे. घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. घरांच्या विक्रमी किमतीमुळे आता सर्वसामान्यांना घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे.
गृह कर्ज घेऊन अनेकांनी आतापर्यंत आपल्या स्वप्नातील घरांची निर्मिती केलेली आहे. विशेष म्हणजे काही लोक या नवीन वर्षात गृह कर्ज घेऊन घर खरेदीचे आपले स्वप्न पूर्ण करणार आहेत.
दरम्यान जर तुम्हीही होम लोन घेऊन घर बनवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास आणि अतिशय महत्त्वाची राहणार आहे.
खरेतर अलीकडे देशातील पब्लिक सेक्टरमधील बँका आणि खाजगी क्षेत्रातील बँका आपल्या ग्राहकांना अल्प व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे गृह खरेदीची स्वप्न पूर्ण होत आहे.
दरम्यान आज आपण सर्वात स्वस्त व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देणाऱ्या बँकांची यादी पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
स्वस्तात गृह कर्ज देणाऱ्या बँका
इंडसइंड बँकेच्या गृहकर्जाचे व्याजदर ८.४% ते ९.७५% पर्यंत आहेत.
इंडियन बँकेचे होम लोनचे व्याजदर ८.४५% ते ९.१% पर्यंत आहेत.
HDFC बँकेचे होम लोनचे व्याजदर 8.45% ते 9.85% पर्यंत आहेत.
UCO बँकेचे गृहकर्जाचे व्याजदर 8.45% ते 10.3% पर्यंत आहेत.
बँक ऑफ बडोदामधील होम लोनचे व्याजदर ८.५% ते १०.५% पर्यंत आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्रमधील गृहकर्जाचे व्याजदर ८.६% ते १०.३% पर्यंत आहेत.
युनियन बँक ऑफ इंडियाचा गृहकर्जाचा व्याजदर ८.७५% ते १०.५% पर्यंत आहे.
IDBI बँक गृह कर्जाचा व्याजदर 8.75% ते 10.75% पर्यंत आहे.
पंजाब नॅशनल बँकेचे गृहकर्जाचे व्याजदर ८.८% ते ९.४५% पर्यंत आहेत.
कोटक महिंद्रा बँकेचे गृहकर्जाचे व्याजदर ८.८५% ते ९.३५% पर्यंत आहेत.