Home Loan : तुम्हीही तुमच्या स्वप्नाच्या घरानिर्मितीसाठी गृह कर्ज घेण्याच्या तयारीत आहात का ? हो, मग आजची ही विशेष बातमी तुमच्यासाठी खूपच फायद्याची ठरणार आहे. भारतात अलीकडे घरांच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत. घरांच्या किमती वाढण्यामागे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत.
वाढती महागाई, बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, इंधनाचे वाढलेले दर, कमी होत चाललेली जागा शिवाय वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, नागरिकीकरण या कारणांमुळे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वधारल्या आहेत.
त्यामुळे आता सर्वसामान्यांना स्वप्नातील घरांसाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. विशेष बाब म्हणजे देशातील प्रमुख बँकांच्या माध्यमातून आता स्वस्तात गृह कर्ज ऑफर केले जात आहे.
त्यामुळे आज आपण एसबीआय, एचडीएफसी, पीएनबी यांसारख्या बँकेकडून गृह कर्जासाठी किती व्याजदर आकारले जात आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोण देतय सर्वात कमी व्याज दरात होम लोन ?
HDFC : ही बँक भारतातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, HDFC ग्राहकांना वार्षिक 8.50 टक्के ते 9.40 टक्के दराने गृह कर्ज ऑफर करत आहे.
हा व्याजदर गृहकर्ज, शिल्लक हस्तांतरण कर्ज, घराचे नूतनीकरण आणि गृह विस्तार कर्जावर लागू राहणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एचडीएफसी बँक ही एक सुरक्षित बँक आहे. आरबीआयने एचडीएफसीला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत ठेवले आहे.
SBI : देशात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत. यामध्ये एसबीआय बँकेचा समावेश होतो. एसबीआय बँक ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असल्याचा दावा केला जातो. ही बँक देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत येते.
दरम्यान एसबीआयच्या गृहकर्जाबाबत बोलायचं झालं तर बँक ग्राहकांना ८.६० टक्के आणि ९.४५ टक्के व्याजदरावर गृह कर्ज ऑफर करत आहे. पण गृहकर्जाचे व्याजदर अनेक घटकांवर अवलंबून असतात. यामध्ये कर्जाची रक्कम, कालावधी, कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर आणि घेतलेल्या गृहकर्जाचा प्रकार यांचा समावेश होतो.
पंजाब नॅशनल बँक : देशातील एक प्रमुख पीएसबी म्हणून या बँकेचा उल्लेख होतो. बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात होम लोन उपलब्ध करून देत असल्याचा दावा करते. बँकेकडून आपल्या ग्राहकांना 8.40 टक्के आणि 10.60 टक्के वार्षिक दराने गृहकर्ज ऑफर केले जात आहे.
ICICI बँक : रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयने अलीकडेच देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली होती. यामध्ये खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेचा देखील समावेश होता. दरम्यान या बँकेकडून दिल्या जाणाऱ्या गृह कर्जाबाबत बोलायचं झालं तर ही Bank ग्राहकांना 9 टक्के ते 10.05 टक्के दराने होम लोन ऑफर करत आहे. पण हा व्याजदर वेगवेगळ्या घटकांवर अवलंबुन असतो.