Home Loan : तुम्हीही होम लोन घेण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरे तर, अलीकडे घरांच्या वाढत्या किमती पाहता अनेकजण गृह कर्ज घेऊन घरनिर्मितीच्या आपले स्वप्न पूर्ण करत आहेत.
जर तुमचाही असाच काहीच आपल्या नसेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण गृह कर्जाचे पाच प्रकार थोडक्यात समजून घेणार आहोत.
एवढेच नाही तर तुमच्यासाठी होम लोन चा कोणता पर्याय सर्वोत्कृष्ट ठरणार आहे याबाबत देखील आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
होम लोनचे प्रकार आणि त्यांच्या विशेषता
घरबांधणीसाठी गृहकर्ज (होम कन्स्ट्रक्शन लोन) : होम कन्स्ट्रक्शन लोन याच्या नावावरून आपल्याला हे कर्ज कोणत्या कारणासाठी मिळत असेल याची कल्पना येते. हे कर्ज ज्यांना स्वतःचे घर बांधायचे आहे त्यांच्यासाठी उत्कृष्ट ठरते.
या अशा प्रकारच्या कर्जात प्लॉटची किंमत तसेच घर बांधण्याची किंमत समाविष्ट असू शकते. पण प्लॉटची किंमत तेव्हाच कव्हर होऊ शकते जेव्हा प्लॉट खरेदी केल्यानंतर एक वर्षाच्या आत कर्ज घेतले जाते.
होम परचेस लोन : तयार असलेले नवीन फ्लॅट किंवा घर खरेदी करण्यासाठी या प्रकाराचे होम लोन घेतले जाते. या अंतर्गत नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी नवीन फ्लॅट किंवा घराच्या 90% एवढी रक्कम कर्ज स्वरूपात मिळू शकते. पण बँकेकडून 80% पर्यंतची रक्कम सहजतेने उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज 20 ते 30 वर्षांच्या कालावधीसाठी मिळते.
होम एक्सटेन्शन लोन : जर एखाद्या व्यक्तीला सध्या अस्तित्वात असलेले घर मोठे करायचे असेल तर होम एक्सटेंशन लोन घेतले जाऊ शकते. घराचा आकार वाढवण्यासाठी या प्रकारचे कर्ज घेतले जाते.
होम इम्प्रूवमेंट लोन : जर तुम्हाला तुमच्या सध्याच्या घराचे नूतनीकरण करायचे असेल जसे की घराची पेंटिंग करायची असेल घराची रिपेरिंग करायची असेल तर बँकेकडून लोन उपलब्ध करून दिले जाते. अशा प्रकारच्या कर्जाला होम इम्प्रूवमेंट लोन म्हणून ओळखले जाते.
ब्रिज होम लोन : हे कर्ज मालक नवीन संपत्ती खरेदी केल्यानंतर जोपर्यंत सध्याची मालमत्ता विक्री करत नाही तोवर उपलब्ध करून दिले जाते.
हे गृहकर्ज विद्यमान मालमत्तेची विक्री करण्यासाठी लागणाऱ्या वेळेमुळे निर्माण होणारी निधीची तफावत भरून काढण्यास मदत करते. ब्रिज लोन सहसा अल्प कालावधीसाठी असतात. बँका हे कर्ज जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी देतात.