Home Rent Agreement : अलीकडे शहरात शिक्षणासाठी तसेच नोकरी, उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग शहराकडे स्थलांतरित होत आहे. अनेक लोक परिवारासह शहरात रोजगारासाठी स्थलांतरित होतात. शहरात नव्याने दाखल झालेले लोक मात्र भाड्याने घर घेऊन राहतात.
शहरातील अनेक लोक अशा लोकांना आपल्या घरात आश्रय देतात. भाडेकरू म्हणून अशा लोकांना आश्रय दिला जातो. यामुळे भाडेकरू ठेवणाऱ्या लोकांना अतिरिक्त उत्पन्न मिळतं. मात्र भाडेकरू ठेवताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते.
दरम्यान आज आपण आपल्या वाचक मित्रांसाठी भाडेकरू ठेवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी बहुमूल्य अशी माहिती घेऊन हजर झालो आहोत. यामुळे जर तुम्हीही तुमच्या घरात भाडेकरू ठेवणार असाल तर ही बातमी तुम्हीही शेवटपर्यंत वाचली पाहिजे.
भाडेकरार केल्यानंतरच भाडेकरु ठेवा
भाडेकरू ठेवण्यापूर्वी त्याची सर्व माहिती काढा. यानंतर भाडे ठरवा. तुमच्या भागात इतर भाडेकरू जे रेंट देत असतील तेवढा रेंट तुम्ही देखील आकारला पाहिजे. त्यापेक्षा अधिक रेंट घेऊ नका. तसेच त्यापेक्षा कमी रेंट देखील घेऊ नका. तसेच भाडेकरू ठेवताना भाडेकरार अवश्य करा. भाडेकरू हा तुमच्या ओळखीचा असेल तरीही भाडेकरार करणे जरुरीचे आहे.
भाडेकराराचा कालावधी कायदेशीरच हवा
कायदेशीररित्या भाडे कराराचा कालावधी 11 महिने असतो. त्यामुळे भाडे करार करताना 11 महिन्याचा भाडेकरार करा. यामुळे तुम्हाला कोणत्याच अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
भाडेकराराची समाप्ती आणि सूचना
करारात दिलेल्या अटींचे जर भाडेकरूने पालन केले नाही तर घरमालक भाडेकरूला घर रीकामे करण्यास सांगू शकतो. तसेच भाडेकरार तोडू देखील शकतो. मात्र भाडेकरूला घर रीकामे करण्यासाठी एका महिन्याचा कालावधी द्यावा लागतो.
लोक इन कालावधी
अशा स्थितीत भाडेकरूला जर शहरा बाहेर जायचे असेल तर त्याला घर मालकाला माहिती द्यावी लागते. घर मालकाला माहिती न देता भाडेकरू शहराबाहेर जाऊ शकत नाही. तसेच यामुळे घरमालकाला घर रीकामे करताना आधीच माहिती द्यावी लागते.
पेमेंट आणि डिफॉल्ट क्लोज
घराच्या रेंटसाठी एक दिवस सेट करा. त्याच तारखेला घरभाडे भाडेकरूला द्यावे लागते अन्यथा मालक अधिकचे पैसे भाडेकरूकडून मोजू शकतो. डिफॉल्ट क्लोजनुसार, या नियमांतर्गत जमीन मालक स्वतःच्या अटी आणि दंड स्वतः ठरवू शकतो.