Home Selling Buying Process : घराची खरेदी आणि विक्री करणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर प्रत्येकाचे आपले स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. या स्वप्नासाठी प्रत्येक जण अहोरात्र काबाडकष्ट करत असतो. आणि बहु कष्टानंतर अनेक जण हे स्वप्न प्रत्यक्षात खरे उतरवतात.
आपल्या आयुष्यभराची जमापुंजी खर्ची करून अनेक लोक घराचे स्वप्न पूर्ण करतात. मात्र हे स्वप्न पूर्ण करताना नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. फक्त घर खरेदीसाठी पैसा जमवतानाच नागरिकांची दमछाक उडते असं नाही तर घरांची खरेदी विक्रीची प्रक्रिया पूर्ण करतांना देखील नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असते.
मात्र आता घर खरेदी विक्री करणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय झाला आहे. आता घर खरेदी केल्यानंतर खरेदीदाराचे नाव करदाता म्हणून ऑटोमॅटिक पद्धतीने लागणार आहे. यासाठी आता महापालिकेत जाऊन स्वातंत्र्य अर्ज करण्याची गरज भासणार नसल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला ही सुविधा राज्याच्या राजधानीत अर्थातच मुंबई महापालिकेत सुरू करण्यात आली होते.
मुंबईत ही सुविधा सुरू झाली आणि तेथील नागरिकांना या सुविधेचा मोठा फायदा झाला. यामुळे ही सुविधा आता राज्यातील पनवेल महापालिकेतही लवकरच सुरू होणार असे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे पनवेल मध्ये ही सुविधा सुरू झाली की त्यानंतर महाराष्ट्रातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या सुविधेचा शुभारंभ केला जाऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे.
ती सुविधा मुंबई महापालिका क्षेत्रात 2019 पासून सुरू करण्यात आली होती. मात्र, तेव्हापासून आत्तापर्यंत राज्यातील कोणत्याच महापालिकेने ही सुविधा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. मात्र आता पनवेल महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उपमहानिरीक्षक (संगणक) अभिषेक देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे, पनवेल महापालिकेने ही सुविधा सुरू करण्यासाठी विनंती केली होती. यानुसार आता ही नवीन सुविधा पनवेल महापालिका क्षेत्रासाठी लागू होणार आहे.
आता येथील कार्यक्षेत्रातील दस्त नोंदणी झाल्यानंतर महापालिकेकडील आणि दस्तातील माहिती 100 टक्के जुळवल्यानंतर तातडीने नव्या खरेदीदाराचे नाव करदाता म्हणून लागणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे. जर ही माहिती जुळली नाही तर महापालिकेकडून खरेदीदाराशी संपर्क केला जाईल असेही देशमुख यांनी नमूद केले आहे.
मालमता खरेदीची नोंदणी झाल्यानंतर त्यांचे ऑटो म्युटेशन होणे आवश्यक असते. एखाद्या मालमत्तेची खरेदी – विक्री झाल्यानंतर मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आणि करदाता अभिलेख (टॅक्स पे रेकॉर्ड) यांवर त्याची नोंद होते. या दोन्ही ठिकाणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून आता स्वयंचलित माहिती पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा सरोवर आणि संबंधित महापालिकेचा सर्वर याचे एकत्रीकरण होते. यामुळे घर खरेदी करणाऱ्या खरेदीदाराला आता करदाता म्हणून नोंदणी करण्यासाठी अर्थातच स्वतःचे नाव मिळकतीवर लावण्यासाठी महापालिकेत जाण्याची गरज राहणार नाही.
आधी ही सुविधा मुंबई महापालिकेत सुरू होती आता पनवेल महापालिकेत देखील ही नवीन सुविधा सुरू होणार आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर अजूनही सुविधा सुरू झालेली नाही. पण आगामी काही काळात संपूर्ण महाराष्ट्रभर ही सुविधा सुरू होऊ शकते असा दावा केला जात आहे.