Hotel Room Booking Rule : आपल्यापैकी अनेकजण कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. तर काहीजण फिरण्यासाठी जातात. दुसऱ्या शहरात गेल्यानंतर मात्र सर्वात आधी आपल्याला हॉटेलमध्ये रूम बुक करावा लागतो.

तुम्हीही कधी दुसऱ्या शहरात फिरण्यासाठी गेला असाल किंवा कामानिमित्त गेला असाल तर तिथे तुम्ही रूम बुक केलेलाच असेल. मात्र रूम बुक करताना सर्वसामान्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

Advertisement

जर तुम्ही नवीन शहरात गेलात आणि रूम बुक करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलात तर तिथे सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड मागितले जाते. जर तुम्ही आधार कार्ड नाही असे सांगितले तर हॉटेल मालकाकडून तुम्हाला रूम देण्यास स्पष्टपणे नकार दाखवला जातो.

अनेकदा लोकांना त्यांच्याकडे फक्त आधार कार्ड नसल्याने हॉटेल मालक रूम देण्यास नकार देतो. यामुळे अशा लोकांना नवीन शहरात रूम मिळवण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात.

Advertisement

अशा परिस्थितीत भारतात हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी खरंच आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे का ? हा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भारतात हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी आधार कार्ड कंपल्सरी आहे का ?

Advertisement

भारतात हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे की नाही, हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक आहे का ? याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात याबाबत एक महत्त्वाचा निकाल देण्यात आला आहे.

सदर निकालात माननीय न्यायालयाने देशात हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी आधार कार्ड कंपल्सरी अर्थातच बंधनकारक नाहीये. म्हणजेच ज्या लोकांकडे आधार कार्ड नाही या एकाच कारणामुळे त्यांना रूम देण्यास नाकारता येणार नाही.

Advertisement

आधार कार्ड ऐवजी वोटर आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी वैध पुरावा देऊनही रूम घेतला जाऊ शकतो. यामुळे फक्त आधार कार्ड नाही यामुळे कोणालाच रूम नाकारता येत नाही. आधार ऐवजी दुसरे कागदपत्रे देऊनहीं रूम घेता येतो. 

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *