Banking News : बँक खातेधारकांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. आपल्यापैकी अनेकांचे बँकेत खाते असेल. काही लोकांचे करंट बँक अकाउंट असेल तर काही लोकांचे सेविंग बँक अकाउंट असेल. दरम्यान आजची ही बातमी अशा सर्वच खातेधारकांसाठी महत्त्वाचे राहणार आहे.

खरंतर, भारतात कॅशलेस इकॉनोमीला सरकारने चालना दिली आहे. यामुळे आता रोकड व्यवहारांऐवजी बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. चेक, आरटीजीएस, यूपीआय पेमेंट अशा विविध पद्धतीने आता पैशांचे व्यवहार होत आहेत. प्रामुख्याने यूपीआय एप्लीकेशनच्या माध्यमातून पेमेंट करण्याकडे आता सर्वसामान्यांचा कल असल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisement

एकंदरीत खेड्यांपासून ते शहरांपर्यंत आणि अशिक्षित लोकांपासून ते सुशिक्षित मंडळीपर्यंत सर्वजण बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. मात्र अनेकांच्या माध्यमातून सेविंग बँक अकाउंट मध्ये किती कॅश ठेवली जाऊ शकते, याबाबत काही नियम तयार करण्यात आले आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बचत खात्यात किती रक्कम ठेवली जाऊ शकते?

Advertisement

आपण सर्वजण संसाराचा गाडा चालवून उरलेले पैसे बँकेत जमा करतो. आपले कष्टाचे पैसे आपण सेविंग अकाउंट मध्ये म्हणजेच बचत खात्यात ठेवतो. पण या बचत खात्यात किती पैसे जमा करता येतील असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की बचत खात्यात पैसे ठेवण्याची कोणतीच मर्यादा नाहीये. याचा अर्थ तुम्हाला हवे तेवढे पैसे यात ठेवता येतात.

पण तुम्ही एका गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे की तुम्ही या खात्यात तेवढीच रोकड ठेवावी जी ITR च्या कक्षेत येते. जर तुम्ही जास्त रोकड ठेवली तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजेवर कर भरावा लागणार आहे. तसेच एका आर्थिक वर्षात जर तुम्ही तुमच्या सेविंग अकाउंट मध्ये 10 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा केली असेल तर तुम्हाला याबाबत आयकर विभागाला सूचना द्यावी लागणार आहे.

Advertisement

जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्यावर आयकर विभागाकडून कारवाई होणार आहे. सोबतच तुमच्या बचत खात्यात ठेवलेल्या रकमेवर तुम्हाला किती व्याज मिळते याची माहिती तुम्हाला आयकर विभागाला द्यावी लागेल. तुमच्या बचत खात्यातील ठेवींमधून तुम्हाला मिळणारे व्याज तुमच्या उत्पन्नात जोडले जाते.

म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीला 10 हजार रुपये व्याज स्वरूपात बँकेकडून मिळाले असतील आणि अशा व्यक्तीचे उत्पन्न 10 लाख रुपये एवढे असेल तर सदर व्यक्तीचे उत्पन्न 10 लाख 10 हजार रुपये एवढे पकडले जाईल. अर्थातच अशा व्यक्तीला 10 लाख रुपयांवर नव्हे तर दहा लाख दहा हजार रुपयांवर कर भरावा लागणार आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *