How To Withdraw PF Money : जर तुम्हीही एखाद्या कंपनीत कामाला असाल आणि तुमचाही पीएफ कट होत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा PF बाबत एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
आज आपण पीएफ खात्यातून पीएफची रक्कम कशी काढायची, यासाठी काय प्रोसेस असते याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर अनेकांकडून PF खात्यातून पीएफ कसा काढायचा याबाबत विचारणा केली जात होती.
यामुळे आज आपण पीएफ खात्यातून घरबसल्या रक्कम काढण्याची प्रोसेस कशी असते, यासाठी मोबाईलवरून कसा अर्ज करावा लागतो, ऑनलाइन एप्लीकेशन केल्यानंतर किती दिवसांनी पीएफ बँक खात्यात जमा होतो, याबाबत थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयीची सविस्तर माहिती.
मोबाईलवरून PF कसा काढणार
PF रक्कम काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या गुगल ब्राउझर मध्ये जायचे आहे. गुगल ब्राउझर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ईपीएफओ मेंबर लॉगिन (epfo member login) असे सर्च करायचे आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंक वर सुद्धा क्लिक करू शकता.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचे लॉगिन डिटेल भरावे लागणार आहेत. लॉगिन डिटेल मध्ये तुम्हाला तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे.
पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तिथे लॉगिन करायचे आहे. यानंतर, स्क्रीनवर एक पॉपअप येईल तेथील later या पर्यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल.
तो OTP तुम्हाला दिलेल्या रकान्यात भरायचा आहे. ओटीपी भरल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या रकान्यात स्क्रीनवर दिसणारा Captcha कोड टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस या पर्यायावर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी असणाऱ्या क्लेम फॉर्म वर क्लिक करायचे आहे. मग तुम्हाला दिलेल्या रकान्यात तुमचा बँक अकाउंट नंबर टाकून वेरिफिकेशन करायचे आहे.
यानंतर तुम्हाला प्रोसेस फॉर ऑनलाईन क्लेम या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला सिलेक्ट क्लेम ऑप्शन मधून पीएफ ऍडव्हान्स हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर तेथे विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे.
मग तुम्हाला तुमच्या पासबुकचा फोटो अपलोड करायचा आहे आणि गेट आधार ओटीपी वर क्लिक करायचे आहे. मग तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. ही सर्व प्रोसेस केल्यानंतर पंधरा दिवसांनी तुमचा पीएफ तुमच्या खात्यात जमा होतो.