ICICI Bank RD Scheme : भारतात अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीमपूर्ण ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागले आहे.
मात्र हे जरी वास्तव असले तरी देखील आजही असे अनेक गुंतवणूकदार आहेत जे सुरक्षित गुंतवणूकीला विशेष महत्त्व देतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजनेत, आरडी योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते.
दरम्यान जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी आयसीआयसीआय बँकेच्या आरडी योजनेत गुंतवणूक करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की, आज आपण आयसीआयसीआय बँकेच्या आरडी योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आयसीआयसीआय बँकेची आरडी योजना
जर तुम्ही RD योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर आयसीआयसीआय बँकेची आरडी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आयसीआयसीआय बँकेकडून 30 महिन्यांच्या आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सात टक्के एवढे व्याज दिले जात आहे.
मात्र ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या माध्यमातून या कालावधीच्या आरडीसाठी 0.50 टक्के अधिकचे व्याज दिले जात आहे. अर्थातच ज्येष्ठ नागरिकांना आयसीआयसीआय बँकेकडून 30 महिन्याच्या आरडी योजनेसाठी 7.50% एवढे व्याज दिले जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना निश्चितच अधिकचा परतावा मिळत आहे.
3 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास
आयसीआयसीआय बँकेच्या 30 महिन्यांच्या आरडी योजनेत एखाद्या सामान्य ग्राहकाने तीन हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर ९८५६३ रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.
तसेच जर याच आरडी योजनेत ज्येष्ठ नागरिकांनी 3000 रुपये प्रति महिना याप्रमाणे गुंतवणूक केली तर त्यांना 99 हजार 208 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. म्हणजेच सामान्य गुंतवणूकदारांना 8563 रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांना 9,208 रुपये एवढे रिटर्न या योजनेतून प्राप्त करता येणार आहेत.