IDBI Bank Privatization : भारतात एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया सहित एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत. या बारा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आयडीबीआय या मोठ्या बँकेचा देखील समावेश होतो. मात्र आयडीबीआय या सरकारी बँकेचे आता खाजगीकरण होणार आहे. यासाठी मोदी सरकारने 2022 पासून कंबर कसली आहे.

गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्येही या बँकेच्या खाजगीकरणाला गती देण्याचा प्रयत्न झाला होता. नोव्हेंबर 2023 मध्ये या बँकेच्या खाजगीकरणाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी केंद्रातील सरकारने प्रयत्न केले होते. मात्र खरेदीदारांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली.

Advertisement

पण आता आयडीबीआयचे लवकरच खाजगीकरण होणार आहे. या प्रक्रियेला या चालू आर्थिक वर्षात मूर्त रूप मिळणार असे चित्र तयार होत आहे. कारण की आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने पडताळणीनंतर आयडीबीआय बँकेचा फिट अँड प्रॉपर रिपोर्ट सादर केला आहे. याचाच अर्थ आता खरेदीदारांना पुढील कारवाई करता येणे शक्य होणार आहे.

Advertisement

यामुळे या चालू आर्थिक वर्षातच अर्थातच 2024-25 या आर्थिक वर्षातचं आयडीबीआय बँकेची खाजगीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आरबीआय ने बँकेचा फिट अँड प्रॉपर रिपोर्ट सादर केला असल्याने आता या चालू महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात खरेदीदार बोली लावणार असा अंदाज आहे.

आयडीबीआय ही देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेत सरकारचा आणि एलआयसीचा मोठा वाटा आहे. मात्र आता सरकार आणि एलआयसी आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहेत.

Advertisement

सरकार 30.48 टक्के आणि एलआयसी 30.24 टक्के एवढा हिस्सा विकणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकंदरीत आयडीबीआय बँकेचे आता खाजगीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काळात या बँकेचे खाजगीकरण पूर्ण होणार आहे. यामुळे सदर बँकेच्या ग्राहकांमध्ये थोडेसे संभ्रमाचे वातावरण आहे.

मात्र जाणकार लोकांनी बँकेचे खाजगीकरण झाल्यानंतरही ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही असे स्पष्ट केले आहे. बँकेच्या सुविधा आता जशा सुरू आहेत तशाच खाजगीकरणानंतरही सुरू राहणार आहेत. यामुळे ग्राहकांनी निश्चिंत रहावे असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *