Health Tips:- शरीराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर शरीरामध्ये जर कुठलीही समस्या निर्माण झाली तर त्याची लक्षणे हे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर आपल्याला दिसून येतात. परंतु आपल्याला माहीत नसल्यामुळे अशा लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करत असतो. जर वेळीच अशी लक्षणे आपल्या लक्षात आली तर आपण वेळेत उपचार करू शकतो व भविष्यात होणाऱ्या त्रासापासून वाचू शकतो.
हात किंवा पाय यावर अनेक प्रकारची लक्षणे आपल्याला दिसून येतात. नेमकी ही लक्षणे जर आपल्याला ओळखता आली तर आपण पटकन होणाऱ्या गंभीर समस्या ओळखू शकतो. याच अनुषंगाने जर आपण पायांचा विचार केला तर बऱ्याचदा पाय आणि पायांच्या पंजांमध्ये काहीतरी वेगळे संकेत आपल्याला दिसून येतात.
याबद्दल जर आपण तज्ञांचे म्हणणे पाहिले तर पायांच्या बोटांमध्ये काही असामान्य दिसत असेल तर याकडे व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे आहे. हे मधुमेह किंवा इतर एखाद्या दुसऱ्या आजाराचा संकेत असू शकते. त्यामुळे या लेखात आपण या विषयी माहिती बघणार आहोत.
पायांवरील या लक्षणांकडे लक्ष द्या
1- नखांच्या आकारात बदल होणे- जर नखांच्या आकारांमध्ये बदल होत असेल तर आपण व्यवस्थित लक्ष देणे खूप गरजेचे आहे. या बदलांमध्ये जर नखे घुमावदार किंवा वाकडी झाली असतील तर हायपो थायराइड किंवा ॲनिमिया,ऑटोइम्युन डिसऑर्डरच्या संकेत असू शकतो.
2- बोट थंड पडणे- जर पायांची बोटे थंड पडत असतील तर हे खराब रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन मुळे होते. ही समस्या डायबिटीस तसेच हार्टसंबंधी काही समस्या, व्हेरिकोज व्हेन्स, धमण्याची समस्या तसेच रक्ताच्या गाठी आणि थायरॉईड यामुळे होऊ शकते.
3- बोटांवर सूज येणे- बऱ्याचदा पायांच्या बोटांवर सूज आल्याचे आपल्याला दिसून येते. हे खराब ब्लड सर्क्युलेशन किंवा लसिकासंबंधी काही डिसऑर्डर असेल तर त्यामुळे देखील होऊ शकते. फंगल इन्फेक्शन, जखम, सोरायसिस ने देखील होते. तसेच सतत उभे राहणे किंवा योग्य प्रमाणात पायात बसतील असे शूज न घालणे किंवा जास्त वजन यामुळे देखील सूज येऊ शकते.
4- पायाच्या पंजांमध्ये झिणझिण्या येणे- पॅरिपेरल न्यूरोपॅथी नावाच्या समस्येमुळे देखील पायामध्ये झिणझिण्या येऊ शकतात. प्रामुख्याने मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ही समस्या असू शकते. यामुळे पाय किंवा हातांची संवेदना कमी होते किंवा नष्ट होते.
हे असे प्रमुख काही संकेत तुम्हाला दिसून आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे हितावह ठरते.