Punjab National Bank Home Loan Details : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे. ज्यामध्ये आपले कुटुंब आणि आपण सुखी समाधानाने राहावे.
तुमचे असेच स्वप्न आहे का ? मग आजचा हा लेख तुमच्यासाठी कामाचा ठरणार आहे. खरेतर घराचे स्वप्न कित्येकजण पाहतात पण अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. जगात असे कितीतरी लोक आहेत, जे हे स्वप्न पाहत उठतात आणि झोपी जातात.
त्यांचे हे स्वप्न अपूर्णच रहाते. याचे कारण म्हणजे अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे अनेक घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारतात. खरेतर गृह कर्ज घेऊन गृह खरेदी करणे वाईट नाहीये.
जाणकार लोक देखील सर्वसामान्यांना गृह कर्ज घेऊन घर खरेदी करण्याचा सल्ला देतात. याचे कारण म्हणजे भविष्यात देखील प्रॉपर्टीचे भाव असेच वाढत राहणार आहेत. दुसरे म्हणजे मोक्याच्या ठिकाणी प्रॉपर्टी मिळत असली तर कधीही ती आधी खरेदी केलेली फायदेशीर ठरते.
कारण की, ती प्रॉपर्टी पुन्हा तुमच्या नशिबात येईल हे सांगता येत नाही. दरम्यान जर तुम्हीही अशाच मोक्याच्या ठिकाणाच्या प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी, गृह खरेदीसाठी होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तिच्यासाठी पंजाब नॅशनल बँकेचे होम लोन फायदेशीर ठरू शकते. आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या होम लोनची माहिती जाणून घेणार आहोत.
पंजाब नॅशनल बँकेचे होम लोनसाठीचे व्याजदर
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 8.40% या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र हे बँकेचे सुरुवातीचे व्याजदर आहे. या किमान व्याजदराचा फायदा फक्त आणि फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच मिळतो.
800 च्या आसपास ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर असेल त्या ग्राहकांना या किमान व्याजदरात गृह कर्ज मिळू शकते अशी माहिती बँकेकडून समोर आली आहे.
50 लाखाचे लोन घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार
जर एखाद्या ग्राहकाला पंजाब नॅशनल बँकेकडून 50 लाख रुपये 20 वर्षांच्या कालावधीसाठी किमान 8.40% या इंटरेस्ट रेटवर मंजूर झालेत तर त्याला 43 हजार 75 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच सदर ग्राहकाला फक्त व्याज म्हणून 53 लाख 38 हजार रुपये भरावे लागणार आहेत. रक्कम आणि व्याज असे एकूण एक कोटी तीन लाख 38 हजार रुपये एवढी रक्कम सदर ग्राहकाला भरावी लागणार आहे.
अर्थातच 50 लाखाचे घर तुम्हाला एक कोटीहून अधिक रुपयांना पडणार आहे.