Kartar 5136 Plus CR Tractor:- शेतकरी आणि ट्रॅक्टर यांचा एक घनिष्ठ संबंध असून सध्या यांत्रिकीकरणाचे युगामध्ये ट्रॅक्टर शिवाय शेती शक्यच नाही. शेतीच्या बऱ्याचशा कामांसाठी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामध्ये अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर शेतकरी खरेदी करतात व त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर शेतात केला जातो.
ट्रॅक्टरच्या दृष्टिकोनातून पाहिले तर शेतातील कामांसाठी मजबूत उत्तम परफॉर्मन्स असलेल्या ट्रॅक्टरच्या शोधात शेतकरी असतात व परवडणाऱ्या किमतीमध्ये चांगला ट्रॅक्टर मिळावा ही अपेक्षा शेतकऱ्यांना असते.
त्यामध्ये आणि कंपन्यांचे ट्रॅक्टर सध्या बाजारात असून त्यातीलच जर आपण एक शक्तिशाली आणि मजबूत ट्रॅक्टरचा विचार केला तर यामध्ये करतार 5136 प्लस सीआर ट्रॅक्टर हा एक शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. याच ट्रॅक्टरची सविस्तर माहिती या लेखात आपण बघणार आहोत.
करतार 5136 प्लस सीआर ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला किर्लोस्कर वॉटर कुल्ड इंजिन 3120cc क्षमतेसह तीन सिलेंडरमध्ये मिळते. ज्या माध्यमातून 50 एचपी पावर जनरेट केली जाते. कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये ड्राय टाइप एअर फिल्टर देण्यात आला आहे. करतार कंपनीचा हा ट्रॅक्टर 2200 आरपीएम जनरेट करणाऱ्या इंजिनसह येतो.
या ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 2.63 ते 33.27 किलोमीटर प्रति तास इतका असून रिव्हर्स स्पीड 3.63 ते 14.51 किलोमीटर प्रति तास इतका आहे. या ट्रॅक्टरचे हायड्रोलिक पावर म्हणजेच वजन उचलण्याची क्षमता एक हजार आठशे किलो इतकी ठेवण्यात आली आहे. हे ट्रॅक्टर 2160 किलो वजनाचे आहे.
हे ट्रॅक्टर मजबूत व्हीलबेससह तयार करण्यात आले असून जास्त वजन उचलल्यानंतर देखील ते उत्तम प्रकारे बॅलन्स सांभाळते. तसेच पावर स्टेरिंग असल्यामुळे पकड देखील खूप चांगली आहे. या ट्रॅक्टरमध्ये 16 फॉरवर्ड आणि चार रिव्हर्स गियर्ससह गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
करतार ट्रॅक्टर तेलात बुडवलेल्या म्हणजेच ऑइल इमर्स ब्रेकसह येतो व हे ब्रेक तेलात बुडवले जातात आणि शेती करताना टायरवर चांगली पकड ठेवतात. या ट्रॅक्टरमध्ये एमआर पीटीओ प्रकारची पावर टेक ऑफ देण्यात आलेली असून जे 540 आरपीएम जनरेट करते.हे ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्हमध्ये येतो व यामध्ये खूप मोठ्या आकाराचे टायर तुम्हाला पाहायला मिळतात.
किती आहे करतार 5136 प्लस सीआर ट्रॅक्टरची किंमत?
भारतातील या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत सात लाख 65 हजार ते आठ लाख 25 हजार रुपये इतकी आहे. तसेच या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत आरटीओ नोंदणी आणि सर्व राज्यांमध्ये लागू असलेल्या काही रोड टॅक्समुळे बदलण्याची देखील शक्यता आहे.