IKEA Pune Store : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे IKEA पुण्यात लवकरच एक नवीन स्टोर खोलणार आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत कंपनीने महत्वाची माहिती दिली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आयकिया ही एक फर्निचर ची रिटेलर कंपनी आहे. ही एक स्वीडिश फर्निचर रिटेलर कंपनी असून या कंपनीने 2022 मध्ये मुंबईच्या आर सिटी मॉल मध्ये एक भव्य शोरूम ओपन केलं होतं.
कंपनीने तब्बल 70 हजार स्क्वेअर फूट जागेत हे भव्य शोरूम उघडलं होतं. त्यामुळे मुंबईकरांना होम फर्निशिंगच्या अर्थातच फर्निचरच्या सर्व वस्तू या भव्य शोरूम मधून खरेदी करता येत होत्या.
विशेष म्हणजे या शोरूमला सुरुवातीच्या टप्प्यात चांगला प्रतिसाद देखील मिळालेला होता. अशातच मात्र या कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमधील हे भव्य शोरूम आता बंद केले जाणार आहे. हे भव्य शोरूम यावर्षीच्या मध्यापर्यंत बंद केले जाणार असे संकेत कंपनीने दिले आहेत.
कंपनीने सांगितल्याप्रमाणे आयकिया वरळी, आयकिया नवी मुंबई आणि ऑनलाईन स्टोअर आता एकत्र केले जाणार आहे.
कंपनीने राजधानी मुंबई मधील आर सिटी मॉलमधील 70 हजार स्क्वेअर फिट जागेत पसरलेले भव्य रिटेल स्टोर या वर्षाच्या मध्यापर्यंत बंद करण्याचे आणि पुण्यात नवीन स्टोअर सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
कंपनीने या संदर्भात बोलताना असे म्हटले आहे की, “मुंबईमध्ये आमचं वाढीचं लक्ष्य आहेच. सोबतच आम्ही शहरासाठी नवीन ओम्नी-चॅनल फॉरमॅटची पाहणी करत आहोत.
सध्याच्या नवी मुंबई साईटला रिटेल डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याकडे, तसंच पुण्यात आमचा फिजिकल प्रेझेंस वाढवण्याकडे कल असणार आहे.
” एकंदरीत आयकिया कंपनीच्या माध्यमातून पुण्यात फिजिकल प्रेझेन्स वाढवण्यासाठी नवीन स्टोअर ओपन होऊ शकते. यामुळे पुणेकरांना लवकरच सर्व होम फर्निशिंगच्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.