8th Pay Commission : जर तुम्ही शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून फ्रेंड सर्कल मधून कोणी सरकारी कर्मचारी असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू केला होता.
म्हणजेच सध्याचा वेतन आयोग लागू होऊन जवळपास सात वर्षांचा काळ उलटला आहे. अशा परिस्थितीत आता सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाचे वेध लागले आहे. यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन वेतन आयोगाबाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.
वास्तविक गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारमधील वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासन दरबारी विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करणार नाही का ? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
पण, काही जाणकार लोकांनी सरकार दरबारी नवीन वेतन आयोगाचा प्रस्ताव सध्या स्थितीला विचाराधीन नसला म्हणजे कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागूच होणार नाही असे होत नाही. कारण की, नवीन वेतन आयोगासाठी अजून बराच वेळ बाकी आहे. दरम्यान आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून शासनावर दबाव तयार केला जात आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
या कारणांमुळे लवकरच लागू होणार आठवा वेतन
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग 1996 मध्ये लागू करण्यात आला. यानंतर सहावा वेतन आयोग 2006 मध्ये लागू झाला. तसेच सध्याचा सातवा वेतन आयोग 2016 मध्ये लागू करण्यात आला. म्हणजेच दर दहा वर्षानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग लागू करण्यात आले आहेत.
गेल्या 30 वर्षांची ही पार्श्वभूमी पाहता आता नवीन आठवा वेतन आयोग हा 2026 पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होणे अपेक्षित आहे. मात्र हा नवीन वेतन आयोग लागू करण्यापूर्वी त्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे. दरम्यान समितीची स्थापना नवीन वेतन आयोग लागू होण्यापूर्वी दोन वर्ष अगोदर करणे अपेक्षित आहे.
म्हणजे 2024 मध्ये आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणे जरुरीचे आहे. त्यामुळे पुढील वर्षी आठवा वेतन आयोगासाठीची समिती स्थापित होईल असा अंदाज आहे. मात्र याबाबत केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही.