Indian Bank FD News : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय आहेत. बँकेची एफडी योजना हा देखील असाच एक लोकप्रिय प्रकार आहे. बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
याचे कारण म्हणजे एफडी मधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला जातो. सहसा एफडीमध्ये केलेल्या गुंतवणुकीत नुकसान सहन करावे लागत नाही. यामुळे अनेकजण FD करतात.
अलीकडे तर बँका एफडी वर चांगले व्याजही देत आहेत. हेच कारण आहे की महिला देखील आता मोठ्या प्रमाणात फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान जर तुम्हीही एफडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी विशेष फायद्याचे ठरू शकते. कारण की, आज आपण इंडियन बँकेने नव्याने लॉन्च केलेल्या चारशे दिवसांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
इंडियन बँकेने लॉन्च केली नवीन एफडी योजना
मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने नवीन 400 दिवसांची एफडी योजना लॉन्च केली आहे. IND SUPER 400 DAYS असे या एफडी योजनेचे नाव आहे. ही एफडी योजना चारशे दिवसांची आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी या एफडी योजनेत चांगले रिटर्न देखील दिले जात आहेत.
कधीपर्यंत करता येणार गुंतवणूक
मात्र जर तुम्हाला इंडियन सुपर 400 डेज या इंडियन बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला यामध्ये लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागणार आहे.
या योजनेत 31 मार्च 2024 पर्यंतच तुम्हाला गुंतवणूक करता येणार आहे. 31 मार्चनंतर या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही. यामुळे लवकरात लवकर या योजनेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
स्पेशल FD योजनेत किती व्याज मिळते
इंडियन सुपर 400 डेज एफडी योजनेत गुंतवणूकदारांना वेगवेगळे व्याजदर मिळत आहेत. सामान्य ग्राहकांना 7.25%, सीनियर सिटीजन यांना 7.75% आणि सुपर सीनियर सिटीजन यांना आठ टक्के एवढे व्याजदर दिले जात आहे.
यानुसार जर एखाद्या सामान्य ग्राहकाने या एफडी योजनेत चार लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर अर्थात चारशे दिवसांनी चार लाख 31 हजार 780 रुपये मिळणार आहे. अर्थातच सदर गुंतवणूकदाराला 31,780 रुपये रिटर्न मिळणार आहेत.