Indian Banking News : जर तुम्हीही एखाद्या बँकेचे खातेधारक असाल अर्थातच जर तुमचे एखाद्या बँकेत खाते असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरंतर अलीकडे रोकड व्यवहाराऐवजी म्हणजे कॅशने व्यवहार करण्याऐवजी डिजिटल पेमेंटने व्यवहार करण्यावर प्रत्येकजण भर देत आहे. डिजिटल पेमेंट तसेच चेकने अलीकडे मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत.
मात्र अनेकांना बँकेच्या चेकबुक संदर्भात असलेले महत्त्वाचे नियम माहिती नाहीयेत. चेकबुक संदर्भातील नियम प्रत्येक खातेदारकाला माहिती पाहिजेत. मात्र आपल्यापैकी अनेकांना याबाबत फारशी माहिती नसते. यामुळे अनेकदा बँकेच्या खातेदारांची फसवणूक देखील होते. यामुळे बँकेचे चेक संदर्भात असलेले काही महत्त्वाचे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
यामध्ये बँकेच्या चेकवर सही कुठे करावी? कोणत्या चेकच्या पाठीमागे सही करावी लागते? कोणाला चेक द्यायचा असेल तर सही कोणत्या बाजूला करावी? याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडिया चे नियम प्रत्येक खातेधारकाला माहिती असणे जरुरीचे आहे. दरम्यान आज आपण कोणत्या चेकच्या पाठीमागे खातेधारकाला सही करावी लागते? याबाबत बँकेचा काय नियम आहे हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सर्वप्रथम आपण चेक म्हणजे काय हे समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चेक ही पैसे काढण्यासाठी ची लेखी हवी असते. ही हमीं वित्तीय संस्था किंवा वैयक्तिक असते. याच्या मदतीने एका खात्यातून दुसर्या खात्यात निश्चित रक्कम भरता येते. चेक एक प्रकारे बँकेचा लेखी आदेश असतो असे आपण म्हणू शकतो.
चेकमुळे दोन खातेधारकांमधील व्यवहार सुरक्षितपणे पार पडतात. पण या अशा महत्वाच्या चेकवर सही करण्यालाही काही नियम बँकेकडून तयार करण्यात आले आहेत. यामध्ये चेकच्या मागील बाजूस सही करण्याचे देखील काही नियम आहेत. यात सर्वच चेकवर मागच्या बाजूस सही करण्याची गरज भासत नसते.
फक्त बेअरर जें चेक असतात त्या चेकवरच मागच्या बाजूस सही करावी लागते. बेअरर चेक हा अशा प्रकारचा चेक आहे, जो बँकेत जमा केला जातो आणि त्यावर कोणत्याही व्यक्तीचे नाव नसते. या अशा चेकच्या मदतीने कोणीही बँकेतून पैसे सहज काढू शकतो.
बँक खातेधारकाच्या सहमतीने जारी केलेले असे बेअरर चेक लगेचच मान्य करते. बँकेच्या नियमानुसार, अशा चेकमुळे झालेल्या फसवणुकीला बँक जबाबदार नसते. एकंदरीत प्रत्येक चेकवर मागच्या बाजूला सही करण्याची गरज नसते. जे बेरर चेक असतात त्यावरच मागच्या बाजूस सही करण्याची गरज असते.