Indian Best Tourist Spot : अनेकांना संपूर्ण जग फिरण्याची इच्छा असते. जगातील प्रमुख पर्यटन स्थळांना भेट देण्याची आवड असते. आपल्यापैकी अनेक जण जगभरातील विविध प्रमुख पर्यटन स्थळांना भेट देखील देऊन आले असतील.

पण आपल्या भारतातही अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत जी जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना देखील मागे पाडू शकतात. जर तुम्हालाही परदेशात फिरण्याची इच्छा असेल मात्र पैशाअभावी परदेशवारी करण्यात तुम्ही असमर्थ असाल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही पर्यटन स्थळांची माहिती देणार आहोत जिथे भेट देऊन तुम्ही परदेशातील पर्यटन स्थळांना देखील विसरणार आहात.

Advertisement

शिलॉंग : हे भारतातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येथे देशभरातील पर्यटक भेटी देतात. विदेशातून आलेले टुरिस्ट सुद्धा या डेस्टिनेशनला आवर्जून भेट देतात. जर तुम्हालाही शिलॉंग येथे भेट द्यायची असेल तर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात या ठिकाणी भेट द्यायला हवी. नोव्हेंबर मध्ये येथे चेरी ब्लॉसम हा फेस्टिवल साजरा होतो. या फेस्टिवल मध्ये या पर्यटन स्थळाला भेट दिली तर तुम्हाला परदेशवारी करण्याची देखील गरज भासणार नाही.

पॉंडिचेरीमधील व्हाईट टाऊन : जर आपणास फ्रान्स फिरण्याची इच्छा असेल तर आपण या ठिकाणाला भेट द्या. येथे भेट दिल्यावर तुम्हाला फ्रान्स सारखाच अनुभव मिळणार आहे. या ठिकाणी असलेल्या फ्रेंच कॉलनीला भेट दिल्यावर तुम्हाला फ्रांसमधील रस्त्यांवर प्रवास करण्याचे समाधान मिळेल.

Advertisement

चित्रकूट आणि नायग्रा धबधबा : चित्रकूट धबधब्यांसोबतच छत्तीसगड राज्यातील बस्तर मधील नायग्रा या जगप्रसिद्ध धबधब्यालाही आपण भेट देऊ शकता. हे डेस्टिनेशन देखील तुम्हाला प्रदेशाचाच अनुभव देणार आहे. या दोन्ही धबधब्यांवर पावसाळ्याच्या काळात मोठी गर्दी असते. अनेक पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देतात. विदेशातून येणारे टुरिस्ट देखील या डेस्टिनेशनवर दरवर्षी मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

उटी : तुम्हाला जर स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा उटीला अवश्य भेट दिली पाहिजे. हे देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. तामिळनाडूमध्ये वसलेले हे पर्यटन स्थळ हिरव्यागार टेकड्या, सुवासिक चहाचे मळे आणि तलाव यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील चहाचे मळे पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक उटीमध्ये गर्दी करतात.

Advertisement

काश्मीर : काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाते. काश्मीरमध्ये पाहण्यासारखें अनेक ठिकाण आहेत. पण काश्मीरमधील ट्यूलिप गार्डन मधून फिरण्याचा आनंद काही औरच आहे. या ट्युलिप गार्डन मध्ये तुम्ही चाललात तर तुम्हाला नेदरलँड मधील मोहक लँडस्केपमध्ये आल्याचा आनंद मिळेल.

केरळ : केरळ राज्यात शेकडो टुरिस्ट स्पॉट आहेत. पण जर तुम्हाला केरळमध्ये जाऊन व्हेनीसचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही केरळमधील अलेप्पी येथील हाऊस बोट मध्ये एक रात्र मुक्काम ठोका. तुम्हाला नक्कीच वेनिसला भेट दिल्यासारखे वाटणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवास तुमच्या खिशाला देखील परवडणारा असेल.

Advertisement

राजस्थान : जर तुम्ही राजस्थान फिरायला गेलेत तर तेथील कुंभलगड किल्ल्याला अवश्य भेट द्या. या किल्ल्याच्या भव्य भिंतींना भारताची ग्रेट वॉल म्हटले जाते. 

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *