India’s Poor State : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातील गरिबी दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जे पण सरकार सत्तेवर येते ते सरकार गरिबी समूळ नष्ट करू असा दावा करते. मात्र स्वातंत्र्याच्या आठ दशकानंतरही भारतातून गरीबी समूळ नष्ट झालेली नाही. आजही गरिबीमुळे कित्येक कुटुंबांना एका वेळेचे जेवणही मिळतं नाही.
आज भारत वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
विशेष म्हणजे तज्ञांनी येत्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. एकीकडे भारत वेगाने विकसित होत आहे आणि महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे.
तर दुसरीकडे भारतात गरिबी, बेरोजगारी या अशा काही समस्या आहेत ज्या की आजही आधी जशा होत्या तशाच आहेत. यामुळे देश जलद गतीने विकसित होत असला तरी देखील जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा बदलत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान आज आपण भारतातील 10 सर्वात गरीब राज्य कोणते आहेत ? आपल्या महाराष्ट्राचा या यादीत कितवा क्रमांक लागतो याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारतातील 10 गरीब राज्य कोणती?
भारतातील सर्वाधिक गरीब राज्यांच्या यादीत बिहार या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. म्हणजे देशातील सर्वाधिक गरीब राज्य कोणते असेल तर ते बिहार आहे. राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक यांच्या आकडेवारीनुसार बिहारचा गरिबी दर 46.50% इतका आहे.
या यादीत झारखंड चा दुसरा क्रमांक लागतो येथे गरिबी दर 34.70% इतका आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांक मेघालय राज्याचा लागतो येथे गरीबी दर 37.60 % इतका आहे. 36.50% गरीबी दरासह मध्यप्रदेश या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
भारतातील सर्वात मोठे राज्य, ऊस उत्पादनात पहिल्या क्रमांकावरील राज्य म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याचा गरिबी दर 31.80% एवढा असून हे या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. आसाम हे राज्य या यादीत सहाव्या क्रमांकावर असून या राज्याचा गरिबी दर 31.30% आहे.
ओडिशा या राज्याचा गरिबी दर 30.90% एवढा असून हे या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. छत्तीसगड हे राज्य या यादीत आठव्या क्रमांकावर आहे आणि या राज्याचा गरीबी दर 30.70% एवढा आहे.
29.80% गरीबी दरासह राजस्थान हे राज्य गरिबांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. या यादीत हरियाणा राज्याचा दहावा क्रमांक आहे, या राज्याचा गरिबी दर 29.20% एवढा आहे.