India’s Richest Cities : भारत हा जलद गतीने विकसित होणारा देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे लवकरच भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.
आपल्या देशाच्या विकासात आपल्या महाराष्ट्राचा देखील सिंहाचा वाटा आहे. अशा परिस्थितीत, आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत शहरे कोणती आहेत? भारतातील कोणत्या शहराचा जीडीपी हा सर्वाधिक आहे ? भारताच्या विकासात कोणकोणत्या शहरांनी आपले योगदान दिले आहे, याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विशेष म्हणजे भारताच्या सर्वाधिक श्रीमंत शहरांमध्ये मुंबई आणि पुण्याचा नंबर कितवा आहे हे देखील आज आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
भारतातील सर्वाधिक श्रीमंत शहरे
मुंबई : मायानगरी मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी म्हणून ओळखली जाते. दरम्यान मुंबई शहर हे देशातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येते.
मायानगरी 310 बिलियनच्या GDP सह देशातील सर्वात श्रीमंत शहर ठरले आहे. भारताला जलद गतीने विकसित बनवण्यात आर्थिक राजधानीचे योगदान सर्वाधिक आहे.
दिल्ली : देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्ली हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत शहर आहे. दिल्लीची जीडीपी 167 बिलियन एवढी आहे.
कोलकत्ता : या यादीमध्ये पश्चिम बंगालच्या राजधानीचा तिसरा क्रमांक येतो. कोलकत्ता हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत शहर आहे. याची जीडीपी 140 बिलियन एवढी आहे.
बेंगलोर : या यादीत बेंगलोर चा चौथा क्रमांक लागतो. 83 बिलियन जीडीपीसह बेंगलोर देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत शहर बनले आहे.
हैद्राबाद : हैदराबादचा जीडीपी ७४ बिलियन एवढा आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत या शहराचा पाचवा क्रमांक लागतो.
टॉप 10 मध्ये पुण्याचा नंबर कितवा
भारतातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत चेन्नई सहाव्या अहमदाबाद सातव्या आणि आपल्या पुण्याचा आठवा क्रमांक लागतो. यानंतर नवव्या क्रमांकावर सुरत आणि दहाव्या क्रमांकावर विशाखापटनमचा नंबर लागतो.